शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:45 IST

कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल.‘वंदे भारत’ अभियानांतर्गत रशियातून रवाना होणारे विमान सोमवारी मध्यरात्रीनंतर ४.१५ वाजता नागपुरात पोहोचणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशात फसलेल्या नागरिकांना परत आणण्यासह आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, ग्लोब्ज, सॅनिटायझरचा उपयोग करण्यात येत आहे. विमातळावर कार्यरत कर्मचारी या बाबींवर विशेष लक्ष देत आहेत. रशियातून येणारे प्रवासी कोणत्या शहरातील आहेत, हे एअर इंडियाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रवासी विदर्भातील आहेत.दोहाहून आलेत १५७ प्रवासीशुक्रवारी दोहाहून नागपुरात १५७ प्रवासी आलेत. यामध्ये ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत इंडिगोच्या चार्टर विमानाने प्रवाशांना नागपुरात आणण्यात आले. हे विमान दुपारी ४.२० वाजता पोहोचले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता मुंबईकडे रवाना झाले.१९ पर्यंत कोलकाताचे उड्डाण नाही६ ते १९ जुलैदरम्यान नागपूरहून कोलकाताकडे होणारे उड्डाण बंद राहणार आहे. कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीवरून कोलकाताहून नागपूरसह दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई आणि अहमदाबाद उड्डाणावर बंदी आणली आहे. कोलकाता विमानतळाने टिष्ट्वटरवर ही माहिती प्रकाशित केली आहे. शनिवारी प्रकाशित करण्यात आलेल्या शेड्युलमध्ये नागपूरहून कोलकाताकरिता ५जुलैला (रविवार) इंडिगोचे विमान ६ई ४०३ रात्री ८.०५ वाजता उपलब्ध आहे.

टॅग्स :russiaरशियाAir Indiaएअर इंडिया