शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मजुराच्या संशयास्पद मृत्यूमुळे हंगामा :  मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्यास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:08 IST

: तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातला.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची मागणी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.धाकचंद सेवकराम बिसेन (२८) रा. नंदपुरा, आमगाव, गोंदिया असे मृत मजुराचे नाव आहे. बगडगंजच्या स्मॉल फॅक्टरी एरियात माधव कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता धाकचंदची संशयास्पद अवस्थेत तब्येत बिघडली. साथीदारांनी त्यास मेडिकलला पोहोचविले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. धाकचंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीय आणि साथीदारांना दु:ख झाले. धाकचंद इमारतीच्या पहिल्या माळ््यावर काम करीत होता. दरम्यान, तो पडला. या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. धाकचंदच्या साथीदारांनी पोलिसांना माहिती देऊन ठेकेदार आणि बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लकडगंज पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी मजुरांना शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत संयम ठेवण्यास सांगितले. पोलिसांच्या भूमिकेमुळे धाकचंदच्या साथीदारांमध्ये संशय निर्माण झाला. त्यांना ठेकेदार आणि बिल्डर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. आज दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर धाकचंदचे साथीदार आणि त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्यात पोहोचले. त्यांनी मृतदेह ठाण्यासमोर ठेवून निदर्शने केली. त्यांनी ठाण्याला घेराव घालून ठेकेदार आणि बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीयांच्या मते, घटनेनंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. धाकचंद इमारतीवरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु त्याच्या मृत्यूसाठी ठेकेदार आणि बिल्डर दोषी आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या प्रकरणात धाकचंदची अचानक प्रकृती बिघडल्याचे सांगितले. ही बाब खोटी आहे. घटनेच्या काही वेळापूर्वी धाकचंद काम करीत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लकडगंज ठाण्यात खळबळ उडाली. लकडगंज पोलिसांनी तपासानंतर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पाऊण तासानंतर ठाण्यासमोर निदर्शने केल्यावर धाकचंदचे कुटुंबीय आणि साथीदार रवाना झाले. लकडगंज पोलिसांच्या मते डॉक्टरांनी धाकचंद नशेत शिडीवरून पडल्याचे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणेagitationआंदोलन