शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:32 IST

सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली.

ठळक मुद्देऑनलाईन रक्कम लंपास : गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली.एमआयडीसीतील फिर्यादी अभिषेक रामनाथ त्रिपाठी यांनी त्यांची जुनी वॉशिंग मशीन, अलमारी आणि अ‍ॅक्टिव्हा विकायची आहे म्हणून ओएलएक्सवर जाहिरात टाकली. ती पाहून आरोपी अरुण ब्रह्मदास राणा आणि जोरा सिंग या दोघांनी संपर्क करून त्या साहित्याचा त्रिपाठी यांच्यासोबत सौदा केला. तुमच्या खात्यात सामानाची रक्कम पाठवतो, असे सांगून त्रिपाठी यांच्याकडून त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि क्यूआर कोड पाठवून त्यांच्या खात्यातून ३२ हजार रुपये काढले. त्याचप्रमाणे त्रिपाठी यांचा मित्र तामसिंह लांजेवर त्याच्या खात्यातून ३५ हजार रुपये तर नरेंद्र उपाध्यायांच्या खात्यातून ४२ हजार ७०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. २० मे ते १६ जून या दरम्यान घडलेल्या या फसवणुकीच्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.गिट्टीखदान मधील अब्दुल अन्सारी यांना ओएलएक्सवर एक आर्टिका कार दिसली. ती विकत घेण्यासाठी त्यांनी भरत जयंतीलाल परमार (रा. कांदिवली, नवी मुंबई) याच्या मोबाईलवर संपर्क केला. आरोपीने कारचा सौदा दोन लाख रुपयात केला. त्यानंतर दोन लाखाच्या कारचे त्यांनी आरोपी परमारच्या खात्यात ४ लाख, २५ हजार रुपये जमा केले. मात्र आरोपी प्रत्येक वेळेस वेगळे कारण सांगून कार न देता रक्कम उकळू लागला. १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे अन्सारी यांनी शुक्रवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.तिसरी फसवणुकीची घटना सक्करदरात घडली. ४३ वर्षीय व्यक्तीच्या आयसीआयसीआय बँक खात्याची माहिती चोरून आरोपींनी त्यांच्या खात्यातून एकूण ५६ वेळा व्यवहार करून तीन लाख ४७ हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित दाम्पत्याने आरोपीसोबत संपर्क साधला. तेव्हा त्याने पीडित व्यक्तीच्या खात्यात ८० हजार ९०० रुपये वळते केले. मात्र उर्वरित रक्कम गिळंकृत केली. १० एप्रिल ते १ जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. पीडित दाम्पत्याने सक्करदरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर