शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:27 IST

आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वनराई फाऊंडेशन व वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे बुधवारी वितरण करण्यात आले. यावेळी ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून सहभागी झाले होते.

भरतनगर येथील वनराई फाऊंडेशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पारशिवनी तालुक्यातील रामाजी लांजेवार व त्यांच्या पत्नी शालिनी लांजेवार यांना या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. यावेळी आ. नीलय नाईक, वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, अजय पाटील, डॉ.पिनाक दंदे, नीलेश खांडेकर, वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. रामाजी लांजेवार यांनी गोमूत्र आणि शेणखताचा उपयोग करुन उत्तम शेती करता येते तसेच जैविक शेतीतून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पुसदला आले की अगोदर शेतीची पाहणी करत. ते खऱ्या अर्थाने शेतीनिष्ठ नेते होते, असे नीलय नाईक यांनी सांगितले. रामाजी लांजेवार यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतीबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अजय पाटील यांनी संचालन केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी