शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदल; उपाययोजनासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:09 IST

जागतिक तापमानातील वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देविधान परिषद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : जागतिक तापमानातील वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.सदस्य हेमंत टकले यांनी नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले, वातावरण बदलाचा विषय व्यापक आहे. त्यावर विस्तृत चर्चा होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, पर्यावरण बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे. प्रदूषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूवरील लसीवर दरवर्षी संशोधन करून आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडिटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए.सी. बंद करून बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल.पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, हरितगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. मोठ्या शहरात प्रदूषणही वाढत आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरातील घनकचरा व्यवस्थापन तसेच बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी राखून ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.शहरातील लोकसंख्या वाढत आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला. डॉ. नीलम  गोऱ्हे , हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७environmentवातावरण