शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:35 IST

महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारने आठ महिने वेळकाढूपणा केला. अध्यादेश काढून ओबीसींची फसवणूक केली, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

नागपूर : भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेल्या निकालावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या एकाही नेत्याने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. ते फक्त राज्यभर मेळावे करत राहिले, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे

राज्य सरकारला माहिती होते की, ‘तो’ अध्यादेश रद्द होणार आहेः महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यांना माहिती होते, की सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन केलेला अध्यादेश टिकणार नाही. तरीही त्यांनी तसेच केले आणि आम्ही ओबीसींचे तारणहार आहोत, असा आव आणला. पण ओबीसी समाज मुर्ख नाही. सर्वकाही त्यांच्या लक्षात आले आहे आणि सरकारमधील तिन्ही पक्षांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

न्यायालयाने अतिशय स्पष्ट निकाल दिला असताना राज्य सरकारने ८ महिने टाईमपास केला. या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इम्पिरीकल डेटा तयार केला असता, तर आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असता. सरकारमधले मंत्री बोलघेवडे आहेत. ते केवळे मोर्चे, मेळावे करीत राहिले. म्हणायला ओबीसी आयोग तयार केला. पण त्यांना संसाधने दिली नाही, निधी दिला नाही. आयोगाचे हात बांधून ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले. या लोकांनी ओबीसीच्या मुद्द्याचा फुटबॉल करून ठेवला. त्यामुळे ओबीसी जनता त्यांना आता सोडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

आताही वेळ गेलेली नाही. सरकार एका महिन्यात डेटा तयार करावा. तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सरकारनेच निवडणूक आयोगाला तशी विनंती करावी. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी आमची भूमिका आहे. तसे न केल्यास आरक्षणासाठी आम्ही राज्यभर आंदोलन पेटवू. ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी सरकारमधला एक मोठा गट सक्रिय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करावयाची कारवाई सरकारने केली नाही आणि सरकारमधले मंत्री आंदोलने करीत आहे, आताही आंदोलनाचे इशारे देत आहेत. ही दुटप्पीपणाची भूमिका आता खपवून घेतली जाणार नाही. षडयंत्र करून ओबीसींसाठी मारक ठरणारे सरकार आहे. त्यामुळे आता ओबीसी जनता शांत बसणार नाही. 

४ मार्च २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सरकारने काम करणे अपेक्षित होते. पण तसे केले गेले नाही. इम्पिरीकल डेटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, केंद्र सरकारचे नाही. जनगणना करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. पण या सरकारने पूर्ण वेळ केंद्र सरकारला दोष देण्याचे काम केले आहे. या सरकारच्या मंत्र्याना  सोडणार नाही. महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी