शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परिस्थितीच्या आव्हानांनी त्यांना 'सावित्री' बनविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:55 IST

भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मी सावित्री’ने बोलते केले : महिला, मुलींनी मांडला रोजचा संघर्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दहा वर्षापूर्वी पतीचे आकस्मिक निधन झाले तेव्हा गीताताईचे वय कमीच होते. अंगावर तीन मुलांची जबाबदारी होती. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाचा, नातेवाईकांचाही आधार मिळाला नाही. अशा परिस्थितीत ती सावित्री झाली. एकटीने हिमतीने कष्ट उपसत मुलांना शिकविले, छोटेसे हक्काचे घर बांधले, मुलीचे लग्न केले, मुले नोकरीलाही लागली. पण तीच मुले लग्नानंतर वेगळा संसार मांडायला निघाली. बांधलेले घर जोडून ठेवण्याचे नवे आव्हान गीताताई समोर आहे. अशीच एक ऋचिता. मुलाशी मैत्री केली म्हणून घरच्यांनी शिक्षणच बंद करून घरात डांबले. अशावेळी ७० वर्षाची आजी तिच्यामागे सावित्री बनून खंबीरपणे उभी राहिली व शिक्षणासाठी नागपूरला पाठविले. ही ऋचिता आज एम.ए. (इंग्लिश) च्या फायनल इयरला आहे. रोजच्या जीवनात संघर्ष करताना अशा असंख्य सावित्रीच्या लेकी आपल्या आसपास आहेत. त्यातीलच काहींनी आपल्या संघर्षाचा उलगडा केला.भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले. संघटनेच्या संयोजक रश्मी पारसकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयाच्या, स्तराच्या महिला व मुलींनी आपला संघर्ष मुक्तपणे मांडला. लठ्ठपणामुळे घरच्यांचा चिंतासूर ऐकणारी व बाहेरच्यांची टिंगल सहन करणारी अंकिता, कमी वयातच पतीच्या निधनामुळे सहन करावा लागत असलेला मानसिक त्रास मांडणारी भारती, अशा अनेक स्त्रियांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रीला संघर्ष करावा लागतो. तिच्या असण्या-दिसण्यावरून, कमजोर समजण्यावरून बरेचदा आप्त व समाजाशी संघर्ष करावा लागतो. तो लहान असो की मोठा, संघर्ष केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हेच यातून दिसून येते. पत्रकार रश्मी मदनकर यांनी मार्गदर्शन करीत युवकांना केवळ स्वत: पुरते जगू नका इतरांसाठी जगा, इतरांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळणारे समाधान हे शाश्वत राहत असल्याचे सांगितले. दर्शना व जितेशा चावरे या दाम्पत्याची ‘सावित्री’ नावाची चिमुकली कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. सावित्री आईच्या कार्याचे सतत स्मरण होत राहावे म्हणून मुलीचे नाव सावित्री ठेवल्याचे आईने यावेळी सांगितले. संचालन स्नेहल वानखेडे हिने केले. आयोजनात योगिता भिवापूरकर, अलका वेखंडे यांचा सहभाग होता.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेnagpurनागपूर