शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक जमीन समाज भवनाला वाटप करण्याच्या आदेशाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:53 IST

हायकोर्टात याचिका : राज्य सरकारने घेतली नाही विरोधाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाभूळखेडामधील अभयनगर येथील सार्वजनिक उपयोगाची जमीन समाज भवन, वसतिगृह व प्रशिक्षण केंद्राकरिता वाटप करण्याच्या आदेशाविरुद्ध अभय गृहनिर्माण सहकारी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हा आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, अशी विनंती संस्थेने न्यायालयाला केली आहे.

सुमारे १०० सदस्य असलेल्या अभय गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अभयनगर ले-आउटचा नकाशा नागपूर सुधार प्रन्यासने १६ मे १९८९ रोजी मंजूर केला आहे. त्यामध्ये ९ हजार ६०० चौरस फूट सार्वजनिक जमीन सार्वजनिक उपयोगाकरिता आरक्षित आहे.

ही जमीन संस्थेने नासुप्रला हस्तांतरित केली आहे. त्यानंतर या जमिनीला सुरक्षा भिंत बांधण्यात आली. येथे मुलांना खेळण्यासाठी बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले व आजूबाजूला पेवर ब्लॉक्स लावण्यात आले. त्यावर सुमारे ३० लाख रुपये खर्च झाले. असे असताना नगर विकास विभागाच्या सचिवांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या वादग्रस्त आदेशानुसार ही जमीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीला संबंधित बांधकामांसाठी वाटप करण्यात आली आहे. 

बांधकामासाठी ५ कोटी ९६ लाख २३ हजार ८६९ रुपये मंजूर केले गेले आहेत आणि बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्याविरुद्ध सरकार व प्रशासनाला वेळोवेळी निवेदने सादर केली, पण त्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

राज्य सरकारला मागितले उत्तर या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता नगर विकास विभागाचे सचिव, नगर रचना विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महानगरपालिका आयुक्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीचे सचिव यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली 

  • याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजू मांडताना विविध महत्त्वपूर्ण मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. 
  • परिसरातील नागरिक या ठिकाणी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करतात. 
  • ज्येष्ठ नागरिक रोज सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. या परिसरात दूरपर्यंत कोठेच मोकळी जागा उपलब्ध नाही. केवळ या जमिनीमुळे परिसरात पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. 
  • परिणामी, वादग्रस्त आदेश अभयनगरातील नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करतो, असे अॅड. वाहाणे यांनी सांगितले. त्यांना अॅड. यश सवाईथूल यांनी सहकार्य केले.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय