शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मिसा बंदींचे पेन्शन बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 23:47 IST

MISA Prisioner pension ban Challengeमिसा बंदींचे पेन्शन रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारला नोटीस बजावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिसा बंदींचे पेन्शन रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध विजय फालके (६६), राजेश सावरकर (६५), मोहन जगताप (६७) व अरविंद ओक(६९) यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात उच्च न्यायालयाने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, गृह विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आणीबाणीविरुद्ध १९७५ ते १९७७ या काळात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना मेन्टेनन्स ऑफ इंटरर्नल सेक्युरिटी अ‍ॅक्ट (मिसा) व दि डिफेन्स ऑफ इंडिया रुल्स अंतर्गत कारागृहात डांबण्यात आले होते. त्या आंदोलकांना मिसा बंदी म्हटले जाते. अशा आंदोलकांचा सन्मान करण्यासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पेन्शन योजना लागू करण्यात आली होती. एक महिन्यापेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्या मिसा बंदींना या योजनेंतर्गत मासिक १० हजार रुपये तर, त्यांच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला ५ हजार रुपये पेन्शन दिली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ही योजना बंद केली आहे. राज्याचा घटलेला महसूल आणि कोरोना संक्रमणाचा आर्थिक फटका यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात ३१ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात यावा व मिसा बंदींना पेन्शन सुरू करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. समीर सोहनी यांनी कामकाज पाहिले.३२६७ बंदींना मिळत होता लाभ३ जुलै २०१८ रोजी या योजनेचा जीआर जारी करण्यात आला होता. या योजनेसाठी २९ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. राज्यातील ३२६७ मिसा बंदींना या योजनेचा लाभ दिला जात होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर