शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या व्यावसायिकरणला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 21:36 IST

धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटेंडर नोटीस रद्द करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी १० जुलै २०२० रोजी टेंडर नोटीस जारी करण्यात आली आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट आहे तर, ६ ऑगस्ट रोजी टेंडर उघडले जाणार आहे. कंत्राटाची मुदत पाच वर्षे राहणार आहे. दरम्यान, या पार्कचा खाणे-पिणे, लग्न समारंभ, मेळावे इत्यासाठी उपयोग केला जाईल. परिणामी, पार्कच्या मूळ उद्देशाची पायमल्ली होईल. मुलांना वाहतूक नियमांचे शिक्षण देण्याकरिता या पार्कचा विकास करण्यात आला होता. तो उद्देश मागे पडून हे पार्क केवळ व्यावसायिक करमणुकीचे केंद्र झाले आहे. तसेच, पार्कमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. ते पार्कमध्ये दारू पितात. प्रेमीयुगुल अश्लील चाळे करतात. सफाई केल्यानंतर प्रत्येकवेळी दारूच्या बॉटल्स व इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून येतात. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. हे पार्क मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. खासगी ऑपरेटर नियुक्त केल्यास पार्कचे व्यावसायिकरण होईल. त्यामुळे वादग्रस्त टेंडर नोटीस रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर