शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:38 IST

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआकर्षक प्रदर्शन : उल्लेखनीय कामगिरीबद्दल होणार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.१२ एप्रिलला नागपुरात गुंजन सभागृहात आयोजित समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच रेल्वे बोर्डाच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या चार रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापकांकडून उल्लेखनीय प्रदर्शन करणाऱ्या मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एका विभागाला संपूर्ण दक्षता शिल्ड आणि विविध विभागीय शिल्ड प्रदान करण्यात येतील. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात होत आहे. यानिमित्त आयोजित प्रदर्शनातून नागरिक, मुलांना शिक्षित करण्यात येईल. प्रदर्शनात भारतीय रेल्वेची ओळख, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचे ऐतिहासिक भवन, मध्य रेल्वे आणि पाच विभागातील स्काऊट आणि गाईड आदी विषयांची माहिती प्रदर्शनात राहील. लोकोमोटिव्ह कोच, माथेरान टॉय ट्रेन आणि बुलेट ट्रेनचे मॉडेल यात आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क राहील.पाच दिवस होम प्लॅटफार्मवरून सुटणार नाहीत गाड्यारेल्वे सप्ताह आणि प्रदर्शनाच्या आयोजनामुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफार्म म्हणजे आठव्या प्लॅटफार्मवरून ८ ते १३ एप्रिलदरम्यान कोणत्याच रेल्वेगाड्या सोडण्यात येणार नाहीत. या प्लॅटफार्मवरून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या संबंधित कालावधीत इतर प्लॅटफार्मवरून सोडण्यात येणार असून, प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेnagpurनागपूर