शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी ‘मिशन संजीवनी’ उपक्रम

By नरेश डोंगरे | Updated: June 29, 2024 21:37 IST

आजारी, अस्वस्थ प्रवाशांना मिळणार तात्काळ आरोग्य सेवा : धावत्या गाडीत फोनवर उपचाराचा सल्ला

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वेस्थानकावर किंवा धावत्या रेल्वेगाडीत अचानक तुमची किंवा तुमच्या नातेवाइकाची अथवा सहप्रवाशाची प्रकृती बिघडली, तर डोन्ट वरी! तुम्हाला ते कळवायचे आहे. संबंधितांना लगेच उपचाराचा सल्ला आणि काही वेळेतच प्रत्यक्ष औषधोपचार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात प्रवाशांसाठी ‘मिशन संजीवनी’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

प्रवासादरम्यान रेल्वेगाडीत आपली किंवा दुसऱ्या कुणाची प्रकृती बिघडली, तर व्यक्ती घाबरून जाते. अशा वेळी काय करावे, ते सुचेनासे होते. मात्र, मिशन संजीवनीमुळे संबंधित प्रवाशाला नेमका काय त्रास आहे आणि अशा वेळी कोणते प्रथमोपचार केले पाहिजेत, त्यासंबंधाने तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देणार आहेत. एखाद्या प्रवाशाला तातडीच्या उपचाराची गरज असेल, तर जवळच्या स्थानकावर त्याला लगेच औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये रेल्वे कर्मचारी, तसेच वैद्यकीय अधिकारी समन्वय ठेवणार आहेत. सध्या ही सेवा नागपूर स्थानकावरून सुरू करण्यात आली असून, लवकरच ती विभागातील अन्य काही रेल्वेस्थानकांवरही सुरू करण्यात येणार आहे.

डायल १३९

प्रवासाला निघालेल्या कुण्या प्रवाशाची रेल्वेस्थानकावर प्रकृती खराब झाली, तर त्याला तात्काळ मिशन संजीवनीचा लाभ मिळणार आहे. धावत्या रेल्वेगाडीत आधी उपचाराचा सल्ला आणि नंतर लगेच उपचार मिळेल. रेल्वेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी त्यासाठी संपर्क करावा लागणार आहे. रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइनवर फोन केला तरी ही सेवा तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार असल्याचा दावा, रेल्वे प्रशासनाने केला आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेnagpurनागपूर