शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात २५ कोटी रुपये जमा करण्याचा केंद्र सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 19:53 IST

अमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा या दोन महामार्गांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम सादर न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २५ कोटी रुपये जमा करण्याचा आदेश केंद्र सरकारला मंगळवारी देण्यात आला.

ठळक मुद्देमहामार्ग दुरुस्तीचे प्रकरण : आदेशावर अंमलबजावणीसाठी एक आठवड्याची मुदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा या दोन महामार्गांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम सादर न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २५ कोटी रुपये जमा करण्याचा आदेश केंद्र सरकारला मंगळवारी देण्यात आला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्या न्यायपीठाने केंद्र सरकारला हा दणका दिला.यासंदर्भात अ‍ॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती कधीपर्यंत केली जाईल याचा कालबद्ध कार्यक्रम ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. तसेच, या निर्देशाचे पालन करण्यात अपयश आल्यास न्यायालयात २५ कोटी रुपये जमा करावे लागतील अशी तंबी दिली होती आणि ही रक्कम या महामार्गांच्या दुरुस्तीकरिता अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली जाईल असे सांगितले होते. याकरिता आणखी वेळ वाढवून दिला जाणार नाही असेही स्पष्ट केले होते. त्यानंतरदेखील केंद्र सरकारने उच्च न्यायालयाचे समाधान होईल अशी कार्यवाही केली नाही. त्याचा दणका केंद्र सरकारला बसला. न्यायालयात २५ कोटी रुपये जमा करण्यासाठी केंद्र सरकारला एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत न्यायालयात रक्कम जमा करण्यात अपयश आल्यास केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिवांनी पुढील तारखेला न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून यावर स्पष्टीकरण द्यावे असे न्यायालयाने सांगितले. या याचिकेवर आता १२ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी कामकाज पाहिले. 

असे आहे प्रकरणअमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा हे दोन्ही महामार्ग खराब झाले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, दोन्ही महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. न्यायालयाने अमरावती-मलकापूर महामार्गाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार, या महामार्गाचे बरेचसे काम अपूर्ण असून ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारhighwayमहामार्ग