शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सेंटर पॉर्इंट स्कूल रडारवर : हायकोर्टाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:59 IST

नियम पायदळी तुडवून हायटेन्शन लाईनखाली अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूल हायकोर्टाच्या रडारवर आली आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात बुधवारी प्रकाशित झालेली बातमी हायकोर्टाने रेकॉर्डवर घेतली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या  सेंटर पॉर्इंट स्कूलच्या एकेक अवैध कृतीचा हिशेब लागणार आहे.

ठळक मुद्देलोकमतची बातमी रेकॉर्डवर घेतलीहायटेन्शन लाईनखाली अनधिकृत बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियम पायदळी तुडवून हायटेन्शन लाईनखाली अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूल हायकोर्टाच्या रडारवर आली आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात बुधवारी प्रकाशित झालेली बातमी हायकोर्टाने रेकॉर्डवर घेतली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या  सेंटर पॉर्इंट स्कूलच्या एकेक अवैध कृतीचा हिशेब लागणार आहे.वीज कायद्यानुसार हायटेन्शन लाईनखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही किंवा कोणत्याही इमारतीवरून हायटेन्शन लाईन टाकता येत नाही. हायटेन्शन लाईन एखाद्या इमारतीवरून जाणार असल्यास इमारतीचे छत व हायटेन्शन लाईनमध्ये ३.७ मीटर अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच, आडव्या बाजूने इमारत व हायटेन्शन लाईनमध्ये २ मीटर अंतर ठेवावे लागते. दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलसाठी हायटेन्शन लाईनखालून २०० मीटरचा रोड बांधण्यात आला आहे. या रोडने रोज शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून जाणे-येणे करतात तसेच शाळेच्या एका भागाचे बांधकाम हायटेन्शन लाईनपासून अगदी जवळ आहे. हा धोकादायक खेळ प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरूआहे, परंतु शाळेच्या अरेरावीला कुणीही थांबवू शकलेले नाही. शाळेवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासन एखाद्या दुर्दैवी घटनेची वाट बघत आहे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हे प्रकरण हायकोर्टाच्या रडारवर आल्यामुळे आता काहीतरी सकारात्मक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेतनोटीस बजावण्याची विनंतीहायटेन्शन लाईनच्या धोक्यामुळे गेल्यावर्षी धर भावंडांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने त्या घटनेची दखल घेऊन धोकादायक हायटेन्शन लाईनविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी होती. दरम्यान, अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांनी सेंटर पॉर्इंट स्कूलच्या दादागिरीविषयी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या बातमीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच बातमीचे कात्रण न्यायालयात सादर केले व सेंटर पॉर्इंट शाळेला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्याची विनंती केली. हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असलेल्या २०४४ घरांच्या मालकांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे सेंटर पॉर्इंट स्कूलला नोटीस बजावणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने यासह अन्य मुद्दे विचारात घेण्यासाठी ४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा