शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य शासनाचे धोरण कामगारविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील ४० कोटी कामगारांनी एकत्रित येऊन सरकारच्या धोरणाविरोधात उभे होण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस व त्यांच्या संलग्नित संस्थांनी केले आहे.

ठळक मुद्देबंधुआ मजदूर करण्याचा आरोप ४० कोटी श्रमिकांना एकजूट होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील ४० कोटी कामगारांनी एकत्रित येऊन सरकारच्या धोरणाविरोधात उभे होण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस व त्यांच्या संलग्नित संस्थांनी केले आहे.संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे संघटन सचिव रवींद्र यावलकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या शासनाने असे कामगारविरोधी कायदे पारित केले आहेत. नव्या कायद्यानुसार ३०० कर्मचारी कार्यरत असलेल्या उद्योग संस्थांना कुठलीही परवानगी न घेता कंपनी बंद क रण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वीचे धोरण १०० कर्मचाºयांवर मर्यादित होते. नव्या कायद्यानुसार कंपनी मालक कधीही आपली संस्था बंद करून कामगारांना घरी पाठवण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे कामगारांवर अचानक बेरोजगार होण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या एका कायद्यानुसार कोणत्याही संस्थेत कामगारांची संघटना स्थापन करण्यासाठी ३० टक्के कामगारांची सदस्यता आवश्यक करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा १५ टक्केवर होती. याशिवाय संघटना स्थापन करताना संस्थेतील कर्मचाऱ्यांचे असणे आवश्यक आहे. श्रम क्षेत्रात काम करणारे या संघटनेचे नेतृत्व करण्यास पात्र राहणार नाहीत. न्यायालयाबाहेर सामंजस्य करण्याचे धोरणही राबविण्यात आले आहे. हे सर्व कायदे मालकांचे हित लक्षात घेऊन करण्यात आले असून कामगारांना मारक ठरणार असल्याचे यावलकर म्हणाले. या धोरणांविरोधात कामगारांना एकजूट करण्यासाठी अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्र नॅशनल युनियन बीएसएनएल वर्कर्स कार्याध्यक्ष दिलीप कोसारे व जिल्हा सचिव सूर्यकांत शेंडेकर यांना जबाबदारी सोपविण्यात आल्याचे यावलकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

टॅग्स :Employeeकर्मचारीnagpurनागपूर