शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी

By admin | Updated: May 23, 2017 01:40 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. रोडची कामे उत्तम दर्जाची व्हावी,

नितीन गडकरी यांचे आयुक्तांना आदेश लोकमतच्या लोकलढ्याला बळ जनमंचच्या पब्लिकआॅडिटची प्रशंसा पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. रोडची कामे उत्तम दर्जाची व्हावी, यासाठी कामांची राज्य सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेमार्फत चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिले. सोबतच चौकशीनंतर अहवाल लोकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात यावा, यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा,असेही त्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. शहरातील सिमेंट रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित क रून याकडे महापालिका प्रशसानाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या वेस्ट हायकोर्ट रोड, ग्रेट नागरोड व प्रतापनगर रिंगरोडच्या कामांची जनमंचने तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली. यात रोडवर भेगा पडलेल्या आहेत.गिट्टी बाहेर पडली आहे. फुटपाथ व पावसाळी नालीचे काम व्यवस्थित नाही. पावसाळ्यात रोडलगतच्या घरांत पाणी शिरण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले. इतरही अनेक त्रुटी आढळल्या. या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. या संदर्भात जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेऊ न रोडच्या निकृष्ट कामासंदर्भात विस्तृत चर्चा केली. शहरातील बहुतेक रस्त्यांच्या बाजूच्या पावसाळी नाल्या बुजलेल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याची पातळी आजूबाजूच्या घरापेक्षा उंच झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरणार आहे. याकडे जनमंचने गडकरी यांचे लक्ष वेधले. नाल्या तातडीने मोकळ्या न केल्यास पावसाळ्यात हाहाकार होणार असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर गडकरी यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाळी नाल्या साफ करण्याचे निर्देश महापालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना दिले. रस्त्यांच्या तपासणीत सहकार्य करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. यावर जनमंचने समाधान व्यक्त केले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे अनिल किलोर यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणले. रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिल्याचे आता अधिकारी सांगतात. असे त्यांच्या निदर्शनास आणले.रस्त्यांची कामे होत असताना महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा काय करीत होती, असा सवाल गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केला. सिमेंट रोडच्या पाहणी उपक्रमाद्वारे जनमंच प्रशासनाला मदतच करीत असल्याचे सांगून गडक री यांनी जनमंचच्या कार्याची प्रशंसा केली. संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याला मदत करण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. रस्त्यांच्या तपासणीत सहकार्य करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. जनमंचच्या कार्याची प्रशंसा करून जनतेच्या समस्या सोडविण्याला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सिमेंट रोडची तपासणी करताना कोणत्याही व्यक्तीचा अथवा पक्षाचा विरोध नाही. कुणाचे समर्थनही करीत नाही. जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा. कामे दर्जेदार व्हावी. हा यामागचा उद्देश आहे. आपण विकासाचे महामेरू आहात, त्यामुळे आपणाकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असल्याचे अनिल किलोर यांनी निदर्शनास आणले. शिष्टमंडळात अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह शरद पाटील, प्रकाश इटनकर, अमिताभ पावडे, प्रमोद पांडे, नरेश क्षीरसागर, नरेश बोरकुटे व अ‍ॅड. मनोहर रडके आदींचा समावेश होता. लोकमतमुळेच पब्लिक आॅडिटउपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. शहराचा विकास व्हावाच परंतु तो स्मार्ट सिटीला साजेसा असावा. सुरू असलेली विकास कामे उत्तम दर्जाची व्हावी. या हेतूने रखडलेले सिमेंट रोड व उत्तम दर्जाची काम होत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. याची दखल घेत जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. यात अनेक त्रुटी आढळून आल्या. लोकमतची वृत्त मालिका व जनमंचचे पब्लिक आॅडिट यांची दखल घेत नितीन गडकरी यांनी निकृष्ट कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले.