शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या दीक्षाभूमीवर जागतिक बौद्ध संस्कृतीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:52 IST

नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबुद्ध महोत्सव १७ पासून : कला, चित्रपट व वैचारिक प्रबोधनाची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या महोत्सवात बौद्ध कला, संस्कृती आणि समृद्ध परंपरेचा अविस्मरणीय उत्सव पाहायला मिळेल. तसेच संगीत कला, चित्रपट व वैचारिक प्रबोधनाची मेजवानीही नागपूरकर रसिकांना मिळेल.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चित्रपट महोत्सवाने बुद्ध महोत्सवाची सुरुवात होईल. १८ तारखेला दुपारी ३ वाजता जपान देशात नोकरीच्या संधी या विषयावर कार्यशाळा होईल. १९ व २० तारखेला दुपारी ३ ते रत्री १० वाजेपर्यंत चित्रपटांचे प्रदर्शन होईल. २१ फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन, त्याच दिवशी बुद्ध महोत्सवाचे थीम साँग सादर केले जाईल. शेख अहिनोद्दीन (बासरी) व त्यांची चमू संगीताचा कार्यक्रम सादर करतील. अ‍ॅलन सेनाउके यांचे (अमेरिका) गिटारवादन होईल. यानंतर विभावरी गजभिये आणि त्यांची चमू नृत्य सादर करतील.२२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता यूपीएससी परीक्षेत यश संपादन यावर कार्यशाळा होईल. त्यानंतर रत्नावली व्याख्यानमालेला सुरुवात होईल. धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे प्रतित्य समुत्पाद (कार्यकारण भाव) यावर मार्गदर्शन करतील. मृणाल थूलकर यांचे भरतनाट्यम् होईल. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलतर्फे नृत्य सादर करण्यात येईल. अरुणाचल प्रदेशच्या चमूचे गीत गायन व बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतिगृहातील विद्यार्थिनी नृत्य सादर करतील. २३ फेब्रुवारीला मिशन इंटरप्रीनरशिप यावर कार्यशाळा होईल. यानंतर सायंकाळी भारतीय व पाश्चिमात्य संगीताचे ‘फ्युजन’ होईल. २४ तारखेला चायनीज व्यायाम कला चि कुंग ही सर्वांकरिता राहील. २५ तारखेला बुद्ध महोत्सवाचा समारोप होईल.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर