शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

गुन्हा दाखल झाल्याने सीडीपीओ, पुरवठादार अडचणीत; अंगणवाडी साहित्य घोटाळा

By गणेश हुड | Updated: June 3, 2024 19:41 IST

विभागप्रमुखांची चिंता वाढली

नागपूर :  अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेच्या निधीतून जिल्ह्यातील  अंगणवाड्यांना  साहित्य वाटपात घोटाळा झाला आहे. या प्रकरणात सर्व १३ सीडीपीओ यांच्या विरोधात पंचायत समिती स्तरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे सीडीपीओ यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग प्रमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

साहित्य घोटाळ्याची चौकशी  करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी अहवालात सीडीपीओ, पुरवठादार व विभाग प्रमुखांवर ठपका ठेवून दोषीकडून रक्कम वसुलीची शिफारस  केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली आहे. प्रशासनाचे पत्र आणि चौकशी समितीच्या अहवालानुसार सीडीपीओ यांच्या विरोधात स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाने बीडीओंना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १३ सीडीपीओंवर भादंविच्या विविध कलमान्वये पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.  पोलिसांनी सीडीपीओ व पुरवठादारांवर भादंविच्या कलम ४२०, ४०९, १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहे.  अंगणवाडी श्रेणिवर्धन योजने अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला होता. हा निधी केंद्र शासनाचा होता. सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील सीडीपीओंच्या खात्यात वळता करण्यात आला. ४९ अंगणवाड्यांमध्ये हे साहित्य पुरविण्यात आले. साहित्य अंगणवाडीत पोहोचण्यापूर्वीच पुरवठादाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोप उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी केला होता.  त्यानंतर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली. विभाग प्रमुखांची चिंता वाढली

या प्रकरणात अटक झाली व ४८ तासात जामीन न मिळाल्यास सीडीपीओ यांच्यावर निलंबन कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या प्रकरणात विभाग प्रमुखांवरही ठपका असल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात प्रशासन काय भूमिका घेते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.