शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या स्ट्राँगरुममधून सीसीटीव्ही, टीव्हीसंच चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:21 IST

रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

अभय लांजेवार /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण ३८४ मतदार केंद्र होते. या संपूर्ण मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक संस्थेची स्ट्राँग रुमसाठी निवड करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. साधारणत: मार्च अखेरपासूनच येथील स्ट्राँग रुमवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात २४ तास कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात होता. सदर मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे डीव्हीआर आणि टीव्हीसंच चोरीला गेले आहेत.निवडणूक अथवा मतमोजणी प्रक्रियेला बाधा पोहचणार नाहीउमरेड विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य नागपूरच्या कळमना येथील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितरीत्या पोहचविण्यात आले. निवडणूक प्रक्रियेचे केलेले व्हिडिओ चित्रीकरणही प्रशासनाकडे उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य रवाना केल्यानंतर उमरेडच्या स्ट्राँगरुमला कुलूप लावण्यात आले. त्या स्ट्राँगरुममध्ये सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि दोन टीव्हीसंच व इतर साहित्य ठेवलेले होते. त्यातील हे साहित्य चोरीला गेले आहे. त्याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. संबंधित साहित्य चोरीला गेल्यामुळे निवडणूक अथवा मतमोजणीच्या प्रक्रियेला कुठलीही बाधा पोहचणार नाही, असा निर्वाळा लोंढे यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :theftचोरीcctvसीसीटीव्ही