शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील दारू दुकानांमध्ये लागणार सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:22 IST

राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदारूदुकानांसमोर खाद्य पदार्थ विक्रीला बंदी

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले.ग्रामीण भागात दारूदुकाने सकाळी ६ पासून रात्री उशिरापर्यंत सुरूअसतात, अशी तक्रार उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे आली. रस्त्यांच्या कडेला देशी दारू विक्रीच्या दुकानांवरून वैध-अवैध दारूची विक्री सुरू असताना या दुकानांसमोर अंडेवाले व अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी याची कसून तपासणी करावी. परवाधारक दुकानदारही अवेळी दुकाने सुरूठेवून विक्री करीत असल्याच्या तक्रारी असून त्यावर अधीक्षकांनी स्वत: तपासणी करून कारवाई करावी. प्रसंगी परवाना निलंबित करण्याची कारवाईही करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. अधिकाऱ्यांनी दररोज १० दुकानांची तपासणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.जिल्ह्यात १२ वॉटर फिल्टर प्लान्टजिल्ह्यात १२ अल्ट्रा वॉटर फिल्टर प्लान्ट लावण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या. या कामासाठी निविदा सूचना काढाव्यात व आमदार निधीतून हे १२ वॉटर फिल्टर प्लान्ट घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.हुडकेश्वर नरसाळा विकास आराखडानगर रचना विभागाने हुडकेश्वर नरसाळा भागाचा विकास आराखडा स्थायी समितीच्या सहा सदस्यांकडे पाठविला आहे. समितीचा अहवाल अजून यायचा आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यात जुजबी सुधारणा असल्यास त्या करून मनपा सभागृहाकडे हा विकास आराखडा पाठवला जाईल व नंतर शासनाच्या मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाईल. महादुला कामठी विकास आराखड्यासाठी सहा जणांची समिती गठित करण्याचे पत्र पुण्याच्या संचालकांना नगर विकास विभागाने पाठविले आहे. मौदा आराखड्यासाठी नागरिकांच्या आक्षेप आणि हरकतींवर सुनावणी झाली आहे. मौदा नगर परिषदेने आराखडा मंजूर केल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली.

 

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी