शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तीन कोळसा कंपन्यांना सीसीआयने ठोठावला १३५ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:30 IST

वर्ष २०१३ मध्ये महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) कोळशाचा पुरवठा करणाऱ्या निविदेत नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता घडवून आणणाऱ्या नागपुरातील तीन कोळसा कंपन्यांना भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) १३५ कोटींचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देभारतीय स्पर्धा आयोगाचे आदेश नियमांचे केले उल्लंघन

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१३ मध्ये महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) कोळशाचा पुरवठा करणाऱ्या निविदेत नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता घडवून आणणाऱ्या नागपुरातील तीन कोळसा कंपन्यांना भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) १३५ कोटींचा दंड ठोठावला आहे.दंड ठोठावलेल्या कंपन्यांमध्ये करमचंद थापर अ‍ॅण्ड कंपनी, नायर कोल सर्व्हिसेस आणि नरेशकुमार अ‍ॅन्ड कंपनीचा समावेश आहे. लोकमतने या प्रकरणाची व्यापक माहिती ७ आॅक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित केली होती, हे विशेष.नागपुरातील विधिज्ञ सुरेंद्र प्रसाद यांनी २०१३ मध्ये सीसीआयकडे कार्टेलची तक्रार केली होती. विशाखापट्टणम येथील कोळसा पुरवठादार बीएसएन जोशी अ‍ॅण्ड सन्स आणि महाजेनको यांच्यात झालेल्या वादातून हे प्रकरण उघडकीस आले होते. पुढे सीसीआयने आॅक्टोबर २०१५ मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीसीआयने के.सी. थापर अ‍ॅण्ड कंपनीवर १११ कोटी ६० लाख, नरेशकुमार अ‍ॅण्ड कंपनीवर १६ कोटी ९२ लाख आणि नायर कोल सर्व्हिसेसवर ७ कोटी १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तिन्ही कोळसा कंपन्यांनी महाजेनकोने २००५ मध्ये जारी केलेली निविदा मिळविण्याकरिता एकसमान दर टाकले आणि २०१३ पर्यंत संबंधित औष्णिक वीज केंद्राला निरंतर कोळसा पुरवठा करण्याची व्यवस्था केल्याचे सीसीआयने बुधवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. निविदा बोलीच्या वेळी तिन्ही कंपन्यांनी बीएसएन जोशी अ‍ॅण्ड सन्सला महाजेनकोकडून कोळसा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळू नये म्हणून कार्टेलच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला.सुरेंद्र प्रसाद यांच्या तक्रारीनंतर सीसीआयने २०१३ मध्ये हे प्रकरण बंद करण्याचे आदेश दिले होते. पण कॉम्पिटिशन अ‍ॅपेलेट ट्रिब्युनलने (कॉम्पॅट) या ‘क्लोजर आॅर्डर’ला बाजूला करीत सीसीआयच्या महासंचालकांला उपरोक्त तक्रारीवर चौकशी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१५ मध्ये दिले.महासंचालकांनी जून २०१६ मध्ये अहवाल सीसीआयकडे सोपविला. आता सीसीआयने नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात तिन्ही कंपन्यांवर दंड ठोठावला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा