शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:03 IST

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्यांमध्ये मुलीच आघाडीवर राहिली आहेत. शहरातून प्रथम येण्याचा मान हा विज्ञान शाखेतील श्रेयशी साहा या विद्यार्थिनीने पटकाविला. जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयशी हिला ९८.६० टक्के गुण प्राप्त झाले.

ठळक मुद्देश्रेयशी साहा ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्यांमध्ये मुलीच आघाडीवर राहिली आहेत. शहरातून प्रथम येण्याचा मान हा विज्ञान शाखेतील श्रेयशी साहा या विद्यार्थिनीने पटकाविला. जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयशी हिला ९८.६० टक्के गुण प्राप्त झाले.  

बारावीच्या निकालात यंदाही विद्यार्थिनींनीच आपली जादू कायम ठेवली. सीबीएसईने कुठलीही गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. मात्र शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही विद्यार्थिनींचीच आहे. विज्ञान, वाणिज्य शाखेत मुलींचाच वरचष्मा दिसून आला. वाणिज्य शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील तन्मय चिंडालिया व निधी पुनिया यांनी ९७.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर मानव्यशास्त्र शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथील ईशा रेड्डी या विद्यार्थिनीने ९७.२० टक्के गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला.नागपूर विभागातून दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. दुपारच्या सुमारास सीबीएसईच्या संकेतस्थळावर निकाल घोषित करण्यात आला. परीक्षेला शहरातील २० शाळांमधून सुमारे १७५० विद्यार्थी बसले होते. जवळपास २०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे.हा तर निकालाचा ‘स्ट्राईक’चसाधारणत: मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ‘सीबीएसई’तर्फे बारावीचे निकाल जाहीर करण्यात येतात. मात्र यंदा कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मे महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर झाले. अनेक विद्यार्थी व पालक सुट्यांसाठी बाहेरगावी गेले आहेत. अशास्थितीत सर्वांसाठीच हा मोठा धक्का ठरला. शाळांमध्येदेखील यासंदर्भात फारशी तयारी नव्हती. ‘सीबीएसई’ने निकालाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’च केला आहे, अशी भावना एका मुख्याध्यापिकेने बोलून दाखविली. निकाल लागल्यानंतर शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता व नेमके किती गुण मिळाले, हे कळल्यानंतर तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकीकडे निकाल पाहत असतानाच ‘व्हॉटस्अ‍ॅप अन् फेसबुक’च्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींना नेमके किती मार्क्स मिळाले, याची माहिती घेणेदेखील सुरूच होते.

विज्ञान शाखा१    श्रेयसी साहा                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९८.६० %२    सार्थक आडे                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९७.४० %३    सत्यप्रकाश करशर्मा        केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर,                ९७.०० %३    कशा सिंह                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर            ९७.०० %४    मयंक चांडक                सेंट झेव्हियर्स हायस्कूल, हिंगणा मार्ग            ९६.८० %५    अंकुशा झंवर                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर            ९६.६० %५    प्रबल गुप्ता                केंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर                ९६.६० %६    अद्वैत देशपांडे                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९६.४० %

वाणिज्य शाखा१    तन्मय चिंडालिया            बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.४० %१    निधी पुनिया                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.४० %२    रजत वर्मा                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.२० %३    ईशिता वर्मा                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.०० %२    साक्षी नांदूरकर                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९६.४० %३    पार्थ देसाई                सेंटर पॉईंट, काटोल रोड                                 ९६.२० %४    अर्चित दालमिया            सेंटर पॉईंट, काटोल रोड                        ९६.०० %५    मोहन वेन्सियानी            बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९५.८० %६    श्रुती श्रीवास्तव            सेंटर पॉईंट, काटोल रोड                        ९५.६० %

मानव्यशास्त्र शाखा    १    ईशा रेड्डी                    बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९७.२० %२    लुबना डोंगरे                सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                           ९७.०० %३    सचिन पटेल                केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर                    ९७.०० %४    अल्हाद राऊत                  सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                       ९६.६० %५    आकांक्षा मिश्रा            सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                           ९६.०० %६    मयूर दुर्गे                    बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९५.६० %

यंदा विज्ञानची बाजीमागील काही वर्षांपासून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अव्वल येत असल्याचे दिसून आले. मात्र यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकाविले. वाणिज्यमध्येदेखील विद्यार्थ्यांना मिळालेली गुणांची टक्केवारी चांगली आहे.‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरात देखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून, अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. 

बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्केशहरातील बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर),सेंटर पॉईंट (काटोल रोड), जैन इंटरनॅशनल स्कूल, केंद्रीय विद्यालय (वायुसेनानगर) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाnagpurनागपूर