शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
6
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
7
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
8
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
9
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
11
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
12
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
13
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
14
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
15
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
16
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
17
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
18
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
19
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
20
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

सीबीआयने पुन्हा उघडली विदर्भातील व्याघ्र शिकारप्रकरणाची फाईल

By admin | Updated: June 4, 2017 16:58 IST

विदर्भात सन २०१३ ते २०१६ या काळात १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण गुन्हे शाखेने (सीबीआय) पुन्हा तपासाची फाईल उघडली आहे.

गणेश वासनिक । अमरावती : विदर्भात सन २०१३ ते २०१६ या काळात १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण गुन्हे शाखेने (सीबीआय) पुन्हा तपासाची फाईल उघडली आहे. मेळघाटच्या मसुंडी येथे दोन वाघांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींचे बयाण चिखलदरा तहसीलदारांसमक्ष नोंदविले आहे. त्यामुळे वाघ शिकारप्रकरणी नेमके काय दडले आहे, हे अद्यापही कळू शकले नाही.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वाघ शिकारप्रकरणाचा छडा लावण्यासाठी १५ एप्रिल ते १० मे २०१७ यादरम्यान सीबीआयची पाच जणांची चमू विदर्भात तळ ठोकून होती. ताडोबा, पेंच, यवतमाळचे टीपेश्वर, मेळघाटातील जारिदा, घटांग, अकोट तर नवेगाव बांध, नागझिरा येथील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा व नागपूर या भागात वाघाची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले होते. विदर्भात तीन वर्षांत एकूण १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी राज्य सरकारने पुढाकार घेत तपास सीबीआयकडे सोपविला होता. त्यानुसार वाघ शिकारप्रकरणी वनाधिकारी, पोलिसांनी काही आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात रवानगी केली होती. मात्र, विदर्भातील व्याघ्र शिकारींचे कनेक्शन राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तर जुळलेले नाहीत ना, याचा मुळाशी पोलीस, वनविभाग पोहोचू शकला नाही. दरम्यान वाघ शिकारीच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे येताच त्याअनुषंगाने तपास सुरु झाला. विदर्भात वाघांच्या शिकारीमागे मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीचा हात असून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याच्या निष्कर्षाप्रत सीबीआय पोहोचली होती. परंतु यापूर्वी पोलीस, वनविभागाने वाघ शिकारप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या बयाणात तफावत असल्याने सीबीआयला तपासामध्ये अनेक अडचणी आल्यात. सीबीआयने तीन टप्प्यात वाघ शिकारींचा तपास चालविला. मात्र, अटकेतील आरोपींनी वाघांच्या हत्यमागे आंतरराष्ट्रीय प्रमुख सूत्रधार कोण? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. परिणामी केंद्र सरकारने सीबीआयला विदर्भातील वाघांच्या शिकारप्रकरणी पुन्हा फाईल उघडण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथील सीबीआयची पाच जणांची चमू चिखलदरा येथे येऊन गेली. मेळघाटातील मसुंंडी येथील दोन वाघांच्या शिकारप्रकरणी अटकेतील तीन आरोपींचे चिखलदरा तहसीलदारांसमक्ष बयाण नोंदविले आहे. यातिन्ही आरोपींना बयाणासाठी सीबीआयने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणले होते, हे विशेष. विदर्भातील एकूण वाघ हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींचे नव्याने बयाण नोंदवून सीबीआयने वेगळ्या दिशेने तपासाची चक्रे सुरू केली आहेत. वाघ शिकारप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा सीबीआय घेणार शोधकेंद्र सरकारच्या निर्देशानुसार विदर्भातील वाघ शिकारींच्या मागे आंतरराष्ट्रीय सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी सीबीआयने पुन्हा तपासासाठी फाईल उघडली आहे. वाघ शिकारप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे बयाण नोंदविले जात आहे. वाघांच्या शिकारप्रकरणी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी असली तरी याटोळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून रसद कोण पुरविते, या मुळाशी सीबीआयला जायचे असल्याने आरोपींचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वाघांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना सीबीआयची चमू घेऊन आली होती. त्यापैकी एका आरोपीची ओळखपरेड घेण्यात आली. याआरोपीला एका स्थानिक शेतकऱ्याने ओळखले. दोषारोपपत्रात नमूद आरोपी तेच असल्याबाबत ‘क्रॉसचेकिंग’ करण्यात आले.- सैफन नदाफतहसीलदार, चिखलदरा