शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसह ठिकठिकाणी सीबीआयची छापामारी : संबंधित वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:46 IST

भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशभरातील १५० ठिकाणी छापे मारले.

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशभरातील १५० ठिकाणी छापे मारले. यातून सीबीआयच्या पथकाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले जाते.रेल्वे, परिवहन, बँक, बीएसएनएल या विभागांसह सामान्य जनतेशी संबंधित किमान २५ सरकारी विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या सरकारकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशभरातील सुमारे १५० ठिकाणी सीबीआयने एकाच वेळी छापे मारले.सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने नागपूरसह मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, सिमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, लखनौ आणि डेहराडून येथील १५० ठिकाणांवर छापेमारी केली. यानंतर कुणी स्पष्ट बोलले नाही. मात्र, रेल्वे, परिवहन, बँक, बीएसएनएल यासह किमान २५ विभागांची या मोहिमेंतर्गत चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथे सामान्य जनतेच्या तक्रारींचा निपटारा कशा प्रकारे केला जातो, या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत आहे का, याची पडताळणीही सीबीआयची पथकं करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर सीबीआय आणि रेल्वे सर्व्हिलन्स विभागाने संयुक्तपणे नागपूरसह छिंदवाडा आणि नयनपूर (मध्य प्रदेश) मध्ये छापेमारी केली. कोट्यवधींच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. या छापेमारीत सीबीआयच्या हाती काय लागले, ते स्पष्ट करण्यास सूत्रांनी नकार दिला. कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरी भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सीबीआयने छापेमारी केल्याच्या वृत्ताने उपराजधानीतील विशिष्ट वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागraidधाड