शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचा लाचखोर अभियंता सीबीआयच्या जाळ्यात; १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 13:12 IST

देयक मंजुरीसाठी मागितली लाच : वणीत कारवाई, कार्यालय व घराचीदेखील झडती

नागपूर : वेकोलिच्या (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) लाचखोर अभियंत्याला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वणी येथील निलजय उपविभागाचा इंचार्ज असलेल्या अभियंत्याचे नाव बी.यू. वाघमारे असे असून, कंत्राटदाराकडून देयकाच्या मंजुरीसाठी त्याने लाच मागितली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याचे कार्यालय व घराचीदेखील झडती घेण्यात आली.

वेकोलिच्या निलजय उपविभागातील नायगाव मुख्य मार्गावरील खड्डेदुरुस्ती तसेच वर्धा नदीवर जीआय शीट्स टाकण्याचे कंत्राट चंद्रपूरच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कामाच्या ३९ लाख रुपयांच्या देयकांना मंजुरी देण्यासाठी अर्ज केला असता वाघमारेने कंत्राटदाराला १४ हजार रुपयांची लाच मागितली. पैसे दिल्यावरच देयकांना मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका त्याने घेतली होती. कंत्राटदाराने यासंदर्भात २३ सप्टेंबर रोजी थेट सीबीआयकडेच तक्रार केली. यानंतर सीबीआय नागपूर कार्यालयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची चौकशी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यावर सापळा रचण्यात आला.

तक्रारदार कंत्राटदाराने १४ हजार देणे शक्य नसल्याचे सांगत १० हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. वाघमारे त्यासाठी तयार झाला व त्याने कंत्राटदाराला पैसे घेऊन बोलविले. कंत्राटदाराने वाघमारेच्या हाती पैसे देताच सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वाघमारेला अटक केल्यानंतर सीबीआयने त्याचे कार्यालय व घराचीदेखील झडती घेतली. यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती सीबीआयचे नागपूर कार्यालय प्रमुख एम.एस. खान यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली. वाघमारेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीएसपी नीरज कुमार गुप्ता हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूर