खापा : परिसरात काेराेनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खापा येथे संत पतीराम महाराज संस्थेच्या राधाकृष्ण सभागृह येथे नि:शुल्क काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती डाॅ. विनाेद दाढे यांनी दिली. मॅक्सकेअर हाॅस्पिटलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये काेराेनाबाधितांना माेफत सेवा दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खापा शहर व परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण कमी हाेत आहे. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता काेविड केअर सज्ज केले आहे. या ठिकाणी लहान मुलांना भरती करून त्यांना पूर्ण सुविधा दिल्या जातील. तसेच गाेरगरीब रुग्णांना उपचार घेणे आवाक्याबाहेर असल्याने त्यांची गैरसाेय टाळण्यासाठी खापा येथे नि:शुल्क सेंटर सुरू केले आहे. येथे फक्त शासकीय नियमानुसार औषधीचे पैसे घेतल्या जाईल, असे सांगण्यात आले. २४ तास डाॅक्टर उपस्थित राहून रुग्णसेवा देणार आहेत. तसेच रुग्णांना दाेन वेळचे जेवण, नास्ता दिला जाईल. २४ तास पॅथाॅलाॅजी व औषधालय सुरू राहील व आवश्यक सुविधा मिळणार आहे. यावेळी डाॅ. अनुज जैन, डाॅ. राैनक बन्साेड, डाॅ. विनाेद दाढे, डाॅ. गायकवाड, डाॅ. पराग साबळे, श्रीकांत चांपूरकर, देवराव दाढे, डाॅ. मेघा नहाटा, डाॅ. गाैरी दाढे, दिवाकर बाेंद्रे, उषा मसूरकर, पराग चिचखेडे, लीलाधर बुरडे आदी उपस्थित हाेते.
===Photopath===
240521\img_20210523_203633.jpg
===Caption===
खापा येथे निशुल्क कोविड सेंटर