रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:11+5:302021-04-13T04:08:11+5:30
कन्हान : पाेलिसांनी बाेरीसिंगाेरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली ...

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
कन्हान : पाेलिसांनी बाेरीसिंगाेरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण सहा लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ११) सकाळी करण्यात आली.
सुभाष दामाजी चांदेवालुके व राहुल येरणे दाेघेही रा.बाेरीसिंगाेरी, ता. पारशिवनी अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. कन्हान पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बाेरीसिंगाेरी शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शिवाराची पाहणी केली असता, त्यांना एमएच-४०/बीजी-२४५६ क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. त्या ट्रॅक्टरच्या झडतीदरम्यान ट्राॅलीत रेती असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीअंती ती रेती विना राॅयल्टी स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकासह अन्य एकास अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर व चार हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकूण सहा लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मेश्राम करीत आहेत.