शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:52 IST

जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.

ठळक मुद्देमूकनायक शताब्दी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.मुक्तिवाहिनी आणि रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजनिर्मितीचे प्रथम मुखपत्र मूकनायक’ शताब्दी समारोह अंतर्गत गुरुवारी डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे डॉ. धनराज डाहाट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ‘जाती अंताचे वर्तमान संदर्भ’ या विषयावर बोलताना डॉ. डाहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय जाती विषयावर खरे संशोधन होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेबांनी जाती संदर्भात मूलभूत विचार मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की, ‘जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. राष्ट्र, नैतिकता उभारू शकत नाही उभारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तडे जातील. जातीच्या प्रश्नातून काहीही साध्य होणार नाही, असेही बाबासाहेब स्पष्ट करतात. जातीच्या प्रश्नाला बाबासाहेब हे बुद्ध तत्त्वज्ञानातून पाहतात. त्यामुळेच त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. धर्मांतराबाबत बाबासाहेब म्हणतात की, जीवनाच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल, मूल्यांमध्ये बदल, विचारसरणी व दृष्टिकोनात संपूर्ण बदल म्हणजे धर्मांतरण होय.धर्मांतर हा शब्द योग्य वाटत नसेल तर नवजीवन असेही त्याला म्हणता येईल. याचा प्रत्यय धम्मदीक्षा सोहळ्यात घेतलेल्या २१ व्या प्रतिज्ञेत स्पष्टपणे दिसून येतो, असेही डॉ. डाहाट यांनी स्पष्ट केले.यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.नरेंद्र शेलार यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन का.रा. वालदेकर यांनी केले.यावेळी नरेश वाहाणे, एन.एल. नाईक, दादाकांत धनविजय, राहुल दहीकर, दिलीप सूर्यवंशी, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. विनोद डोंगरे, संजय गोडघाटे, सेवक लव्हात्रे, श्रीराम बन्सोड, धर्मराज निमसरकर, शिवचरण थूल, नलिनी डहाट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर