शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चोरट्यांचा असाही निर्ढावलेपणा; कबुतराच्या नावाखाली रोख आणि सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:33 IST

महिला घरी हजर असताना चोरट्याने वरच्या माळ्यावर जाऊन धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर घरमालकिणीने हटकले असता कबुतर आणायला गेलो होतो, असे सांगून तो पावणेतीन लाखांचा ऐवज घेऊन निघून गेला.

ठळक मुद्देघरमालकिणीसह शेजारीही स्तब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला घरी हजर असताना चोरट्याने वरच्या माळ्यावर जाऊन धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर घरमालकिणीने हटकले असता कबुतर आणायला गेलो होतो, असे सांगून तो पावणेतीन लाखांचा ऐवज घेऊन निघून गेला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुनापूर येथे शनिवारी दुपारी १.३० ते २.२० दरम्यान ही खळबळजनक घरफोडीची घटना घडली.हनुमान मंदिराजवळ पुनापूर, कळमना येथे धर्मराजविजय हजारे यांचे निवासस्थान आहे. ते प्रॉपर्टी डिलर आहेत. घरची पुरुष मंडळी नेहमीप्रमाणे बाहेर निघून गेल्यानंतर शनिवारी दुपारी १.३० वाजता स्वाती धर्मराजविजय हजारे (वय ३२) या आणि त्यांची जाऊ घरकाम करीत होत्या. काही वेळेनंतर त्या जिन्याजवळ येऊन बसल्या. दुपारी २.२० च्या सुमारास वरच्या माळ्यावरून एक तरुण खाली उतरताना दिसला. ते पाहून स्वाती यांनी त्याला तू कोण आणि कशाला वर गेला होता, अशी विचारणा केली. कबुतर आणायला वर गेलो होतो, असे सांगून आरोपी भरभर खाली उतरला आणि निघून गेला. कम्पाऊंडच्या गेटसमोर त्याचा साथीदार एक दुचाकी घेऊन उभा होता. त्यावर बसून आरोपी पळून गेला. काही वेळेनंतर स्वाती आणि त्यांची जाऊ वरच्या माळ्यावर गेले असता त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. कपाटातील रोख २५ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख, ७५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पतीला ही माहिती दिली. त्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

पोलीसही चक्रावलेया प्रकरणाची परिसरात माहिती कळताच हजारेंच्या घरासमोर मोठी गर्दी जमली. घरच्या महिला घरी हजर असताना निर्ढावलेल्या चोरट्यांनी ही चोरी केल्याचे कळल्याने प्रत्येकजण स्तंभित झाला. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर घटनाक्रम ऐकून काही वेळेसाठी पोलीसही चक्रावले.

टॅग्स :Crimeगुन्हा