लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रोडवरील खड्डे व खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांविषयी अत्यंत गांभीर्याने वृत्तांकन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वृत्तपत्रांचे कौतुक केले. ‘लोकमत’ने हा विषय गेल्या काही महिन्यांपासून लावून धरला होता. यासंदर्भात वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले होते.उच्च न्यायालयाने वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन रोडवरील खड्ड्यांवर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वृत्तपत्रांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. वृत्तपत्रे समाजातील समस्यांबाबत सजग असणे आवश्यक असते. सध्या रोडवरील खड्डे अत्यंत गंभीर समस्या झाली असल्याचे वृत्तपत्रांमुळे न्यायालयाला कळले. परिणामी, त्याची दखल घेता आली असे न्यायालय यावेळी म्हणाले.‘लोकमत’ने गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाला रोडवरील खड्ड्यांबाबत जागृत केले. त्यातून खड्डे बुजविण्याचे कामही सुरू झाले. परंतु, शहरात आजही अनेक रोडवर धोकादायक खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमुळे प्राणघातक अपघात होत आहेत. नागरिकांना जीव धोक्यात टाकून वाहने चालवावी लागत आहेत. परिणामी, खड्डे बुजविण्यासाठी वेगवान हालचाली करणे आवश्यक झाले आहे.
खड्ड्यांचे प्रकरण : हायकोर्टने केले वृत्तपत्रांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:31 IST
शहरातील रोडवरील खड्डे व खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांविषयी अत्यंत गांभीर्याने वृत्तांकन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वृत्तपत्रांचे कौतुक केले.
खड्ड्यांचे प्रकरण : हायकोर्टने केले वृत्तपत्रांचे कौतुक
ठळक मुद्दे‘लोकमत’ने वेळोवेळी वेधले लक्ष