शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

काटोल न.प.चे मुख्याधिकारी गराटेसह दोघांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:43 IST

FIR on Katol NP chief Garate, crime news काटोल नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या एकूण ३८ गुंठेवारी प्रकरणात अनधिकृतरीत्या मंजुरी दिल्या प्रकरणी काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह न.प.चे सहायक नगर रचनाकार दिनेश गायकवाड आणि रचना सहायक विपीन भांदककर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देगैरकायदेशीर गुंठेवारी प्रकरण अंगलट: मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर (काटोल ): काटोल नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या एकूण ३८ गुंठेवारी प्रकरणात अनधिकृतरीत्या मंजुरी दिल्या प्रकरणी काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह न.प.चे सहायक नगर रचनाकार दिनेश गायकवाड आणि रचना सहायक विपीन भांदककर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काटोल पोलिसांनी मंगळवारी रात्री या तिघांवर कलम ४२०,४०९, १६६,१६७,३४ अंतर्गत गुन्हे दाखल करीत तपास सुरु केला आहे. काटोल नगर परिषद हद्दीतील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणात जबाबदारी नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र काटोल पोलिसांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, काटोल यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानुसार सोमवरी रात्री तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. यात मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. काटोल नगर परिषदेंतर्गत सर्व्हे नंबर २१४/६ नवीन (१०३८) मध्ये व सर्व्हे क्रमांक ६७१ व ६७२ (नवीन सर्वे नंबर ७२६ व ७२७) मध्ये गुंठेवारी करते वेळी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार राधेश्याम बासेवार यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत काटोल उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यावर तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून येत असून या प्रकरणातील पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, नागपूर यांना नगर विकास विभागाच्यावतीने ४ नोहेंबरला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणी कारवाई करण्याचे पत्र दिले होते.महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण )अधिनियम २००१ अनधिकृतरीत्या मंजूर केलेल्या ३८ प्रकरणांचा यात समावेश आहे.

गराटे कर्तव्यावर कसे?

काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्या गुंठेवारी प्रकरणात गुन्हा दाखल असताना ते मुख्याधिकारी पदावर कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी