शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

असे आहे प्रकरण - फाशी की जन्मठेप ?

By admin | Updated: January 31, 2016 03:08 IST

दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा युग ...

नागपूर : दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे या दोन्ही आरोपींनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून अपहरण केले होते. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता खुद्द डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव ‘मोहसीन खान’ असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ‘युग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असे अपहरणकर्ता म्हणाला होता. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह गवसला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचे शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेयो इस्पितळात डॉ. अविनाश वाघमोडे, डॉ. एच. के. खरतडे आणि डॉ. एम. एस. गेडाम यांच्या पॅनलने केले होते. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा त्यांनी अभिप्राय दिला होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्युपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपींविरुद्ध २७ नोव्हेंबर २०१४ रोजी २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीस ८जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. डॉ. मुकेश चांडक यांची पहिली साक्ष तपासण्यात आली होती. सरकार पक्षाने ५० साक्षीदार तपासले. उल्लेखनीय म्हणजे एकही साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाला नाही. बचाव पक्षाने सात साक्षीदार तपासले परंतु ते सरकार पक्षाच्या साक्षीदारांना कोणताही धक्का पोहचवू शकले नाहीत. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, लिगल एडमार्फत मिळालेले आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजश्री वासनिक, आरोपी अरविंद सिंग याच्या वतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. सहायक फौजदार अरविंद चव्हाण, नायक पोलीस शिपाई तेजराम देवळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. सीसीटीव्ही फुटेज ठरला पुरावा महत्त्वाचा पुरावा दोन्ही आरोपी मोटरसायकलने युगला घेऊन सावनेरकडे जाताना कोराडी मार्गावरील सुंदर आॅटो सेंटर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहेत. मोटरसायकल चालवणारा राजेश तोंडाला फडके बांधलेला, मागे अरविंद सिंग आणि त्यांच्या मध्ये युग हा लोंबकळलेल्या स्थितीत दिसत आहे. सीसीटीव्हीचा हा पुरावा महत्त्वाचा ठरला. त्यांच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरणाऱ्या माधुरी धवलकर आणि पंप मॅनेजरने आरोपींना ओळखले होते. राजेशच्या प्रेयसीने ‘तू माझ्या नर्सिंग ट्रेनिंगच्या दोन लाखांचा खर्च कसा करशील? असे विचारले असता तो म्हणाला होता, ‘तू पैशाची काळजी करू नको. मी एक मोठे काम करणार आहे, त्यानंतर पैसाच पैसा कमावणार आहे.’ ‘मै बडे आदमी के लडके का किडनॅप करनेवाला हूँ’, या पैशातून कार विकत घेईल, एक बीअरबार सुरू करेल त्याचप्रमाणे घर बांधेल, असे तो म्हणाला होता, असे प्रेयसीने साक्षीत सांगितले होते. राजेशनेच युगच्या अपहरणाचा कट रचला होता, असे संदीप किसनलाल कटरे याने न्यायालयात माहिती दिली. आधी राजेश आणि सहकाऱ्यांनी संदीपच्या सहारा कंपनीच्या मालकाला लुटण्याची योजना आखली होती. ही योजना फिसकटल्याने राजेशने आपल्या मालकाच्या मुलाच्या अपहरणाची योजना संदीप कटरेला सांगितली होती. जरीपटका येथील मोबाईल रिचार्ज शॉपीचे मालक मोहनलाल बालानी यांनी अरविंद सिंगला ओळखून यानेच कॉईन बॉक्सवरून पाच कोटींची मागणी होती, असे सांगितले होते. तो १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास माझ्या दुकानात सायकलने आला होता. फोन करायचा आहे, असे तो म्हणाला होता. त्याने १० रुपयाची नोट देऊन १० ‘कॉईन घेतले होते. ‘पाच करोड लेकर आ’, असे तो फोन करणाऱ्याला म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मी ‘शॉक’ झालो होतो, असेही बालानीने सांगितले होते. पाटणसावंगी भागात नामदेव ढवळे, शाळकरी मुले दिव्या चंदेल आणि अन्य लोकांना दोन्ही आरोपी मोटरसायकलवर लहान मुलाला घेऊन दिसले होते. माजी पोलीसपाटील श्रीराम खडतकर यांना ते मुलाला घेऊन लोणखैरीच्या पुलाखाली जाताना दिसले होते.