शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादी-आरोपीच्या तडजोडीमुळे खटला रद्द होऊ शकत नाही- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:56 IST

कायद्याचा दुरुपयोग झाल्यावरच अधिकाराचा उपयोग

- राकेश घानोडेनागपूर : केवळ फिर्यादी व आरोपी यांनी परस्पर सहमतीने तडजोड केली म्हणून एफआयआर, दोषारोपपत्र वा खटला रद्द केला जाऊ शकत नाही. कायदेशीर प्रक्रियेचा प्रचंड दुरुपयोग झाल्याचे आढळून आल्यावरच यासंदर्भातील अधिकाराचा उपयोग केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांनी दिला.सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार आहेत. परंतु, या अधिकाराचा कुणाच्या सांगण्यानुसार उपयोग करता येणार नाही. न्यायालये कायद्याचे रक्षक असतात. त्यामुळे प्रकरणातील मुद्दे सूक्ष्मपणे तपासणे व कायद्यानुसार निर्णय देणे, हे प्रत्येक न्यायालयाचे कर्तव्य आहे. केवळ फिर्यादी व आरोपी यांच्यात तडजोड झाली. या आधारावर फौजदारी प्रकरण रद्द केले जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रियेचा प्रचंड दुरुपयोग झाल्याचे, प्रकरण कायम ठेवून आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता नसल्याचे, सरकारने कायद्याची पायमल्ली करून एखाद्याला गुन्ह्यात गोवल्याचे किंवा यासारख्या अन्य गंभीर बाबी आढळणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.नागपूर येथील आरोपी डॉ. संगीता डफ व फिर्यादी मुकेश जुमडे यांनी आपसात तडजोड करून निष्काळजीपणाच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र व खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर कायदेशीर मुद्दे स्पष्ट करून हा अर्ज फेटाळून लावला. जुमडे यांच्या पत्नी स्वाती यांचा जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. त्यामुळे जुमडे यांनी डॉ. डफ यांच्या निष्काळजीपणामुळे स्वाती यांचा मृत्यू झाल्याची तक्रार २६ सप्टेंबर २०१३ रोजी सक्करदरा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर तीन सदस्यीय तज्ज्ञ समितीने स्वाती यांच्यावर वेळेवर योग्य उपचार करण्यात आले नाहीत, असा अहवाल दिला होता. जेएमएफसी न्यायालयात खटला प्रलंबित डॉ. डफ यांच्याविरुद्ध जेएमएफसी न्यायालयात खटला प्रलंबित आहे. त्यांच्याविरुद्ध दोषारोप निश्चित झाले आहेत. यापुढे साक्षपुरावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणातील पुरावे लक्षात घेता सरकारला आरोपीविरुद्धचे दोष सिद्ध करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे आणि खटला चालविल्यावरच ते शक्य असल्याचे सांगितले.