शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाने घेतला निर्णय : विद्यार्थ्यांनी केला कुलगुरुंना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.बी.कॉम. च्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर शुक्रवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत आलेल्या चुकीच्या प्रश्नांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित निर्णय घेतला. बीकॉम अंतिम वर्षाच्या फायनान्शियल अकाऊंटिंग- ३ या विषयाच्या तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले होते. पेपर सेटरने एका गाईडमधून प्रश्न चोरी केले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ही चोरी लपविण्यासाठी प्रश्नातील आकड्यांमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक २ (सी) व प्रश्न क्रमांक ३ (सी) मध्येही घोळ होता.या संबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. लवकरच हे प्रकरण विषय तज्ज्ञ समितीकडे पाठविले जाईल. समितीच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल.अधिकारीही मानत आहे चूक परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नपत्रिका पाहून त्यातील तीन प्रश्नात चुका असल्याचे मान्य केले. आकड्यांची हेराफेरी करण्यात ही चूक झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेला अंतिम रुप देताना आकड्यांचा ताळमेळ साधण्यात आलेला नाही, असेही यावरून दिसते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी