शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव वाघाचे अवयव चोरी प्रकरणी डॉक्टर कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:46 IST

महाराराष्ट्र  राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देएमझेडएने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराराष्ट्र  राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे.सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये बाजीराव वाघाच्या शवविच्छेदनादरम्यान डॉ. बाविस्कर यांनी वाघाच्या अवयवाचे नमुने चोरल्याचा आरोप मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजही हाते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. परंतु तूर्तास तरी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, या पूर्वीही डॉ. बाविस्कर यांनी परवानगी न घेता खापा वन क्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या वाघिणीचा पाय कापून संशोधनासाठी घेऊन जाण्याचे प्रयत्न केल्याची लेखी तक्रारही हाते यांनी केली होती.सूत्रानुसार, प्राधिकरणाची बुधवार १४ मार्च रोजी व्हेटरनरी डॉक्टराच्या तात्पुरत्या नियुक्तीवर बैठक झाली. यात काही वन अधिकाऱ्यांनी डॉ. बाविस्कर यांच्यावर असलेल्या आरोपांना घेऊन त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यावर आक्षेप घेतला. बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुख्य वनसंरक्षक एस.एस. डोले, डीएफओ एस. बी. भलावी, डीएफओ कमलाकर धामगे, एलडीओ मनिषा पुंडलिक आणि नागपूरचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुनचे प्रतिनिधी एसीएफ विशाल बोराडे आदि उपस्थित होते.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू