शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:26 IST

राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही.

ठळक मुद्देदारूच्या नशेत गोंधळ, हुल्लडबाजी करणाऱ्यांनो खबरदार पोलीस आयुक्तांचा खणखणीत ईशारा

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. अशात कुणी दारूच्या नशेत गोंधळ घातला, हुल्लडबाजी केली किंवा निर्ढावलेपणा दाखवला तर त्याला नवीन वर्षांचे स्वागत पोलीस कोठडीतून करावे लागेल, असा ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिला. यावेळी सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे उपस्थित होत्या.

थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने जागोजागी पार्टीचे आयोजन केल्या जाते. अतिउत्साहाच्या भरात डीजे लावून नृत्याच्या नावाखाली धिंगाणा केला जातो. गर्दीच्या ठिकाणी महिला-मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाद वाढतात अन् नंतर हाणामारी किंवा प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडतात. दारूच्या नशेत अनेक जण गोंधळ घालतात. सुसाट वेगाने वाहने चालवून स्वतासोबत दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघात घडतात.

सध्या ओमायक्रॉनचा धोका सारखा वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावही झपाट्याने होताना दिसतो आहे. ते लक्षात घेता राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. पोलिसांकडे सेलिब्रेशन पार्टीसाठी ३१ अर्ज आले होते. या सर्वांची परवानगी आम्ही नाकारली आहे, असे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे ५ हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार असून, हुल्लडबाजी, रश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांचे मेडिकल करून कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांची तीक्ष्ण नजर

  • मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच हॉटेलला (५० टक्के उपस्थिती) परवानगी. मोठ्या हॉटेलमध्ये कुणी लपून पार्टी केली तर गेल्या वर्षी रामदासपेठेतील हॉटेलमध्ये झालेल्या कारवाईपेक्षा कडक कारवाई केली जाईल.
  • लपूनछपून पार्टी करणाऱ्यांवर, सोशल मिडियाच्या माध्यमातून पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवरही पोलिसांनी नजर.
  • ओपन पार्टीला बंदी. टेरेस, बाल्कनी किंवा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये परवानगी नाही. घरातील सदस्यांसह घरात साजरे करा सेलिब्रेशन.
  • शहराच्या सर्व सिमांवर नाकेबंदी. बाहेरून पिऊन आलेल्यांची होणार तपासणी. गार्डन, तलावावर बॅरिकेडस् . उड्डाणपुलावरही बॅरिकेडस्.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी31st December party31 डिसेंबर पार्टीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉनNew Yearनववर्ष