तरुणांनी केली कारची ताेडफाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:10 IST2021-02-27T04:10:47+5:302021-02-27T04:10:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : दाेन अनाेळखी तरुणांनी घरासमाेर उभ्या असलेल्या कारची ताेडफाेड केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) ...

The car was stolen by the youth | तरुणांनी केली कारची ताेडफाेड

तरुणांनी केली कारची ताेडफाेड

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : दाेन अनाेळखी तरुणांनी घरासमाेर उभ्या असलेल्या कारची ताेडफाेड केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) येथे गुरुवारी (दि. २५) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली असून, ती घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

एमएच-३१/सीएस-२०५९ क्रमांकाची ही कार काॅंग्रेसचे खापरखेडा शहर अध्यक्ष पंंढरीनाथ उके, रा. वॉर्ड क्रमांक-३, खापरखेडा, ता. सावनेर यांच्या मालकीची आहे. ते त्यांचे कुटुंबीय गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास झाेपी गेले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अवंती डाेईफाेडे यांना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ताेडफाेड करण्याचा आवाज ऐकायला आला. त्यांनी खिडकीतून बघितले असता, त्यात दाेन तरुण पंढरीनाथ उके यांच्या कारची दांड्याने ताेडफाेड करीत असल्याचे दिसले. त्यामुळे डाेईफाेडे कुटुंबीयांनी पंढरीनाथ उके यांना माहिती दिली.

डाेईफाेडे यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, त्यांनाही हा घटनाक्रम लक्षात आला. दाेघेही मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास पांढऱ्या माेटरसायकलने तिथे आले आणि त्यांनी दांड्याने कारच्या काचा फाेडल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. कारच्या काचा फाेडण्याच्या दाेन घटना यापूवीर्ही खापरखेडा येथे घडल्या आहेत. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी पंढरीनाथ उके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: The car was stolen by the youth