शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलला धडकून कार उलटली ,९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:47 IST

समोरील मोटरसायकलला धडक दिल्यानंतर वेगात असलेली कार रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटली. त्यात दुचाकीवरील चौघे गंभीर तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्गावरील बोर्डा शिवारात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील कन्हानच्या बोर्डा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: समोरील मोटरसायकलला धडक दिल्यानंतर वेगात असलेली कार रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटली. त्यात दुचाकीवरील चौघे गंभीर तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्गावरील बोर्डा शिवारात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.गंभीर जखमींमध्ये रामगोविंद बच्चालाल यादव (२८), त्याची पत्नी गरिमा यादव (२६), मुलगा सूर्यांश (३), मुलगी काव्या (६) रा. गजानननगर, नागपूर यांचा तर किरकोळ जखमींमध्ये चुंगेश्वर मुरारी नाकतोडे, ध्यानचंद महादेव बुरेवार (५४), शेखर चिंतामण श्रीरामे (५७), सरिता चुंगेश्वर नाकतोडे व मिलिंद विठ्ठलराव वानखेडे, सर्व रा. नागपूर यांचा समावेश आहे. यादव कुटुंबीय एमएच-४०/आर-४५२१ क्रमांकाच्या मोटरसायकलने रामटेकच्या दिशेने जात होते. तर चुंगेश्वर नाकतोडे व त्यांचे सहकारी एमएच-४०/एसी-५४२१ क्रमांकाच्या कारने रामटेकला एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी जात होते.दरम्यान, बोर्डा शिवारात कारने समोर असलेल्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला व ती कार रोडच्या कडेला जाऊन उलटली. यात सर्वजण जखमी झाले. त्यांना लगेच कन्हान शासकीय रुग्णालयात आणले. तिथे सर्वांवर उपचार केल्यानंतर किरकोळ जखमींना सुटी देण्यात आली तर गंभीर जखमींना कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी कारचालक चुंगेश्वर नाकतोडे यांच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातcarकार