शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कार चालकाचा हैदोस : अनेक वाहनांना धडक, एकाचा बळी घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:54 IST

बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देगिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेदरकारपणेकार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. प्रकाश अढाऊ असे आरोपी कारचालकाचे नाव असून, तो अजनीच्या समर्थनगरात राहतो.शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास आरोपी अढाऊ याने त्याची वॅगनआर कार (एमएच ३१/ एफए १५९४) निष्काळजीपणे चालवून सेमिनरी हिल परिसरात हैदोस घातला. टीव्ही टॉवर चौकाजवळ त्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतरही गती कमी न करता समोरच्या टपरीवाल्याकडे कार वळवली. अनेक जणांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचविला. आरोपीने बाळकृष्ण रामकृष्ण वासनिक (वय ६२, हजारीपहाड) यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली. नागरिकांनी धाव घेतल्याचे पाहून आरोपी कारमधून पळून गेला. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तिकडे धावला. त्यांनी संतप्त जमावाला कसेबसे शांत केले. त्यामुळे परिस्थिती निवळली. गंभीर जखमी झालेल्या वासनिक यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.जयराम बाळकृष्ण झलके यांची तक्रार नोंदवून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कारचालक अढाऊविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार