शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी सेक्युलर देणार का यंग टीसर्चला आॅफर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 2:33 PM

सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी विद्यापीठातील संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देसंग्राम परिषदेनेही दंड थोपटलेपदवीधर महासंघही देणार टक्कर

जितेंद्र ढवळेआॅनलाईन लोकमतनागपूर : सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी विद्यापीठातील संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ४ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या या निवडणुकीत शिक्षण मंचाला रोखण्यासाठी सेक्युलर पॅनेल, यंग टीचर्स असोसिएशन, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद आणि पदवीधर महासंघ नवी राजकीय मोट बांधतील, अशी चर्चा आहे.विद्वत् परिषदेत दमदार यश मिळाल्याने सेक्युलर पॅनेलचा उत्साह वाढला आहे. यासोबत सिनेट आणि अभ्यास मंडळावर नंबर वन राहिल्याने यंग टीचर्स असोसिएशनने पदवीधर मतदारसंघासाठी दंड थोपटले आहेत. पदवीधर मतदारसंघात दहाही जागा ताब्यात घ्यायच्या असल्यास महाआघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो, असा सूर विद्यापीठातील राजकीय गोटात आहे. मात्र सेक्युलर आणि यंग टीचर्सला एकत्र बसविण्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा? कुणी किती जागा लढवायच्या याबाबत दोन्ही गटात सध्या एकमत व्हायचे आहे.२०१० मध्ये यंग टीचर्ससोबत असलेल्या शिक्षण मंचने अद्याप या मतदारसंघाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही. गतवेळी यंग टीचर्स आणि शिक्षण मंचला एकत्र बसविण्यात डॉ.गौरीशंकर पाराशर यांनी महत्त्वाची भूमिका वठविली होती. मात्र सिनेट आणि विद्वत् परिषदेत धोबीपछाड झाल्याने मंच ही निवडणूक स्वबळावर ताकदीने लढवेल, हे निश्चितच.विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघावर भाजपची पकड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर प्रा. अनिल सोले यांनी ती कायम ठेवली आहे. विद्यापीठाच्या राजकारणावर नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा यावेळी जास्त प्रभाव असण्याची शक्यता आहे. भाजपने ही निवडणूक मनावर घेतली तर शिक्षण मंचचे कल्याण होईल.कोण मारणार बाजी ?२०१० मध्ये या मतदारसंघासाठी ८५,५७६ पदवीधरांनी नोंदणी केली होती. २०१७ मध्ये यात १८ हजार ९०० पदवीधरांची भर पडली आहे. या मतदारसंघासाठी प्रत्यक्षात ३४ हजार ५०० मतदार होते. यात यावेळी घट होण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात एकूण १० जागांसाठीच निवडणूक होईल ज्यापैकी प्रत्येकी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यातील व्यक्ती असेल आणि एक महिला सदस्य असेल.‘समविचाराने सेक्युलर आणि यंग टीचर्स आले तर हरकत नाही. आम्ही यंग टीचर्ससाठी पाच जागा सोडू. मात्र सध्या कुणाशीही चर्चा झालेली नाही.’- अ‍ॅड.अभिजित वंजारी

नेते, सेक्युलर पॅनेल.‘कुणी कोणतीही आॅफर दिली नाही. यंग टीचर्स असोसिएशन दहाही जागांवर उमेदवार उभे करेल.’- डॉ.बबनराव तायवाडेअध्यक्ष, यंग टीचर्स असोसिएशन‘ पदवीधर मतदारसंघात संग्राम परिषद चमत्कार घडवेल. दहाही जागा लढवू आणि जिंकूही. समविचारी पक्ष एकत्र आले तर छानच. मात्र सध्या कुणाचीही आॅफर नाही. ’किरण पांडवअध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद‘पदवीधर महासंघ तायवाडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवेल. आम्हाला तीन जागा हव्या आहे. कुणासोबत आघाडी करायचे हे एकत्र आल्यावर ठरवू.’महेंद्र निंबार्तेनेते, विद्यापीठ पदवीधर महासंघ.

 

 

टॅग्स :Electionनिवडणूकuniversityविद्यापीठ