शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:12 IST

लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले.

ठळक मुद्देमुंबईत नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. जर विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करायची असेल तर सर्वच जागांवर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावा, अशी भूमिका यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत लोकसभा निवडणुकांमधील अपयश, ‘डॅमेज कंट्रोल’सोबतच येणाºया काळातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विविध मुद्यांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मतदेखील जाणून घेण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचा अहवाल मांडला. त्यासोबत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती दिली. या जागांवर लोकसभेतील कामगिरीवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला. उत्तर नागपुरात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. याचे श्रेय दुसऱ्या फळीतील नेता व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकांत यश मिळवायचे असेल तर लवकरात लवकर उमेदवारांची नावे घोषित व्हावी. जर असे झाले तर उमेदवाराची मानसिक तयारी होते व ते विविधांगी विचार करून मतदारांपर्यंत पोहोचू शकतात, असा सूर या बैठकीत होता. जर पक्ष उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकत नसेल तर कमीतकमी उमेदवाराला खासगीत निरोप द्यावा, असेदेखील एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.

पटोले, जिल्हाध्यक्ष अनुपस्थितबैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे, अनंतराव घारड, अमोल देशमुख, हुकूमचंद आमधरे, माजी आमदारएस. क्यू. जमा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले हे अनुपस्थित होते. मुळक यांच्या अनुपस्थितीतच ग्रामीण भागातील सहा जागांवर चर्चा झाली.

टॅग्स :congressकाँग्रेस