शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

‘कॅन्सरला कॅन्सल करा’ उद्या नागपुरात

By admin | Updated: April 25, 2017 01:33 IST

‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

‘लोकमत’ व कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाचा संयुक्त उपक्रमनागपूर : ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. त्यापैकी नागपुरातील वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे २६ एप्रिल रोजी, सकाळी १० वाजता तज्ज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टिना अंबानी, प्रसिद्ध सिने अभिनेता इमरान हाश्मी व लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे सहकार्य मिळाले आहे.या परिसंवादात डॉक्टर्स, फिजिशियन्स, वैद्यकीय समुपदेशक, समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कर्करोगावर मात करून नवीन आयुष्य सुरू करणारे अनेकजण या वेळी त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगणार आहेत. या उपक्रमाद्वारे पथनाट्य, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे. ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ९३२२१४४४४४ या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग आॅन करा ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट एकजीवनस्वस्थजीवन डॉट ईन’वर.(प्रतिनिधी)कर्करोगाचा विळखादेशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे १० लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. २०३५ पर्यंत ही आकडेवारी १७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्प्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरूकता असणे महत्त्वाचे ठरते. परिसंवादात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर्सनागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वालकोकिलाबेन रुग्णालयाचे कन्सलटंट ब्रेस्ट अ‍ॅण्ड कोलोरॅक्टल आॅन्कॉलॉजी विशेषज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी कोकिलाबेन रुग्णालयाच्या आॅन्कॉलॉजीचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री.कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्राआयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईतस्नेहांचल पॅलिअ‍ॅटीव्ह केअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी पाटीलसायको आॅन्कॉलॉजिस्ट एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या डॉ. सुचित्रा मेहता राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मानोंदणीसाठी संपर्क कराकर्करोगाबाबत सविस्तर माहिती, त्यावरील अद्ययावत उपचार, नवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त डॉक्टर, समाजसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून यासाठी आतिश वानखेडे यांच्याशी ९९२२४४४२८८ या नंबरवर संपर्क साधावा.