शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार थांबला; मतदार सज्ज; आता लक्ष मतदानाकडे.. रॅलींमुळे अनेक भागात वाहतूक झाली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:17 IST

Chandrapur : मनपा निवडणुकीच्या १० दिवसांच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. १३) शेवटचा दिवस शहरात प्रचंड राजकीय गजबजाट घेऊन उजाडला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपा निवडणुकीच्या १० दिवसांच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. १३) शेवटचा दिवस शहरात प्रचंड राजकीय गजबजाट घेऊन उजाडला. सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराची अधिकृत सांगता होणार असल्याने, सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. उमेदवारांचा प्रचार थांबला असून मतदार मतदानासाठी सज्ज झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, तर भाजपकडून भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हंसराज अहीर व आमदार किशोर जोरगेवार यांनी आपआपल्या पक्षातील उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.

रॅलींमुळे अनेक भागात वाहतूक झाली कोंडी

प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी 'रोड शो'द्वारे शक्तीप्रदर्शन केले. समर्थकांच्या गर्दीमुळे अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला. गुरुवारी (दि. १५) १७प्रभागांतील ६६ जागांसाठी मतदान होणार असून, ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

अन् रॅलींना उधाण

शेवटच्या टप्प्यात रॅली, रोड शो, मिरवणूक, कॉर्नर सभा व प्रचार वाहनांसाठी सादर केलेले अर्ज प्रशासनाकडे प्रलंबित होते. सोमवारी (दि. १२) या अर्जाना मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळताच या उमेदवारांनी आपआपल्या प्रभागात जोरदार रॅली काढत प्रचाराचा शेवट गाजविला.

महिलांची रॅली व 'डोअर टू डोअर' प्रचारावर भर

किल्ल्याच्या आतील प्रभागांमध्ये महिलांच्या रॅलींना विशेष महत्त्व देण्यात आले. काही उमेदवारांनी २० ते ३० महिलांचे पथक तयार करून 'डोअर टू डोअर' प्रचार करत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला. युवक व कार्यकर्ते भरदुपारीही घामाघूम होऊन प्रचारात व्यस्त दिसून आले.

प्रचार गीतांनी शहर दणाणले

पठाणपुरा गेट, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, विनबा गेट परिसरात प्रत्येक चौकात सभा सुरू होत्या. तुकूम, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, वडगाव परिसरातही घोषणाबाजी व प्रचार गीतांनी वातावरण ढवळून निघाले. प्रचार वाहनांची सतत ये-जा आणि भोंग्यांमधील गाण्यांनी शहर दणाणून गेले.

अपक्षांचीही दुचाकी रॅली

मनपा निवडणुकीत १२६ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनीही पायी फेऱ्या, दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. मुख्य चौकांत मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Election Campaign Ends; Voters Ready; Focus on Polling

Web Summary : Chandrapur's election campaign concluded with rallies and roadshows. Political parties intensified efforts to reach voters. Traffic congestion was reported. Polling for 66 seats in 17 wards is scheduled, with all parties considering this election crucial. Independent candidates also showcased their strength.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग