शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून आला आणि मित्राची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:25 IST

नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली.शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. सुरेंद्र सुखदेव तभाने (वय ३२) असे मृताचे नाव आहे तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कलवा ऊर्फ दीपक सोनी आणि बाबा पन्नी अशी आहेत. हे दोघेही गुंड आहेत. ते कोरोनामूळे नुकतेच कारागृहातून बाहेर आले आणि त्यांनी गुन्हेगारी सुरू केली.सुरेंद्र तभाने हा शांतिनगरात राहत होता. तो गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन समोसा चिवडा विकायचा शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच साईबाबा नगरात आरोपी राहतात. सुरेंद्र याची आरोपी दीपक सोनी तसेच बाबा पन्नीसोबत मैत्री होती. ते नेहमी एकत्र बसून दारू प्यायचे. नेहमीप्रमाणे आज दुपारी १च्या सुमारास सुरेंद्र तसेच आरोपी कलवा आणि बाबा हे तिघे दारू पीत बसले. ते पाहून सुरेंद्रचा मोठा भाऊ नरेंद्र याने या तिघांना हटकले. घरासमोर दारू पीत बसणे योग्य नाही, लहान मुले बघतात, असे म्हणून त्यांना येथून जाण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी सुरेंद्रला जबरदस्तीने बाजूला असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेले आणि दारू पीत बसले. काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दारू पितापिताच आरोपीने सुरेंद्रच्या डोक्यावर हातोडा आणि दगडाने मारणे सुरू केले. ते पाहून बाजूला खेळणारी मुले आरडाओरड करत तभाने यांच्या घरी आली. त्यांनी नरेंद्र यांना तुझ्या भावाला आरोपी कलवा आणि बाबा पण्णी हातोड्याने मारत असल्याचे सांगितले. त्यामुळे नरेंद्र धावतच गेले. त्याने कलवा याला पकडून दोन ठोसे लगावले. त्याच्या हातून हातोडा हिसकावून घेतला. त्यामुळे कलवाने चाकू काढला मात्र नरेंद्रने प्रतिकार केल्यामुळे आरोपी कलवा तसेच बाबा पन्नी दोघेही तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेंद्रला त्याच्या भावाने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचित पडून होता. त्यामुळे नरेंद्र शांतिनगर पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. सुरेंद्रला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.परिसरात थरारभर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. पोलिसांनी नरेंद्र चव्हाण यांची तक्रार नोंद घेत आरोपी कलवा उर्फ दीपक सोनी असेच बाबा पन्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून