शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आंब्यामध्ये आढळले कॅल्शियम कार्बाईड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:09 IST

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. ‘एफडीए’ने विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : गेल्या वर्षी पाठविलेल्या नमुन्याचा आता आला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. ‘एफडीए’ने विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे.राजू रामवचन कटारिया, रा. भोजपूर आजमगड उत्तर प्रदेश असे त्या आंबे विक्रेत्याचे नाव आहे.अन्न प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कृत्रिम पद्धतीने फळे पिकविणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केट यार्ड कळमना येथील दुकान क्र. ३५ मधून राजू रामवचन हे कॅल्शियम कार्बाईडद्वारे आंबे पिकवीत असल्याची बाब उघडकीस आली. अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी यांनी त्यावर कारवाई करीत २४० किलोचे ३ हजार ६०७ रुपये किमतीचे आंबे जप्त केले. काही आंबे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. विक्रेत्याकडे विक्रीचा परवानाही नव्हता. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. यात आंबा कॅल्शियम कार्बाईडद्वारे पिकविला गेल्याचे स्पष्ट होऊन आंब्यातच कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. अहवालानुसार अन्न प्रशासनाने मुख्य न्यायदंडाधिकारी नागपूर यांचे न्यायालयात खटला दाखल केला आहे.फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडवर प्रतिबंधकृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांनी सांगितले, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यावसायिकांनी विहित परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा व फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करू नये, असे आवाहनही केले.

टॅग्स :fruitsफळेMarketबाजार