शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रॉमात प्रायोगिक स्तरावर कॅज्युअल्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:17 IST

महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता मेडिकलच्या अपघात विभागात जाण्याची गरज पडणार नाही. थेट ट्रॉमातच तातडीने उपचार होतील. मेडिकल प्रशासनाने यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर’ (सीएमओ) उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देमेडिकल : अपघातातील गंभीर जखमींना मिळणार तातडीने उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता मेडिकलच्या अपघात विभागात जाण्याची गरज पडणार नाही. थेट ट्रॉमातच तातडीने उपचार होतील. मेडिकल प्रशासनाने यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर’ (सीएमओ) उपलब्ध करून दिले आहेत.रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोयी मिळाव्यात या दृष्टीने पंतप्रधान सुरक्षा योजनेच्या निधीतून मेडिकलने ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम केले. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. परंतु आवश्यक सोयी व मनुष्यबळाच्या अभावी ट्रॉमा केअर सेंटर आपल्या मुख्य उद्देशापासून दूर होते. याला घेऊन व ट्रॉमाच्या बांधकामातील त्रुटींना घेऊन ९ मे रोजी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्यासह स्थानिक आमदारांनी पाहणी केली. यात त्यांनी विना कॅज्युअल्टीशिवाय ट्रॉमा केअर सेंटर सुरू असल्यावर आश्चर्य व्यक्त केले. ‘सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम’ नसल्याने रुग्णांवर कसे लक्ष ठेवले जाते याचा जाबही अधिकाऱ्यांना विचारला. या सर्व त्रुटींना घेऊन नुकतेच मुंबईत समितीसमोर वैद्यकीय शिक्षण विभागाला साक्ष द्यावी लागली. यात विभागाच्यावतीने शक्य तितक्या लवकर कॅज्युअल्टी सुरू करण्याचे व ‘सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम’ लावण्याची ग्वाही देण्यात आली. याला घेऊन आज सोमवारी समितीच्यावतीने विचारणाही झाली. यामुळे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रॉमाची पाहणी करून मंगळवार १२ जूनपासून प्रायोगिक स्तरावर कॅज्युअल्टी सुरू करण्याचे निर्देश दिले. यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘सीएमओ’ची ड्युटी कॅज्युअल्टीमध्ये लावण्यात आली आहे. याच आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने कॅज्युअल्टी सुरू होण्याचे संकेतही डॉ. निसवाडे यांनी दिलेत.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर