शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीला नाकारला जामीन

By admin | Updated: December 20, 2015 03:07 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. नीलेश महादेवराव हिवरे (२३) असे आरोपीचे नाव असून, तो व्यंकटेशनगर येथील रहिवासी आहे. पीयूष रविराव टेंभेकर (२५) असे मृताचे नाव असून, तो भांडेप्लॉट येथील रहिवासी होता. २० मार्च २०१५ रोजी पीयूषचा मृतदेह नंदनवन भागातील एनआयटी घरकूलनजीकच्या हनुमानमंदिरच्या मैदानात आढळून आला होता. सिमेंटच्या दगडाने अज्ञात आरोपींनी या युवकाचे डोके ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. नंदनवन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश्वर राऊत यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून नीलेश हिवरे आणि शुभम रामूजी हिंगणेकर यांना अटक केली होती. आरोपींविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय पुरावे आढळून आले होते. आरोपी नीलेश हिवरे यांनी जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र प्रकरण गंभीर असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक मनीष वाकोडे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)