शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:11 IST

मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.

ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात नागपुरातही आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धर्म जोडण्यासाठी असतो, विभागण्यासाठी नाही. धर्माचे राजकारण करण्याला संविधान परवानगी देत नाही. मात्र धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे षडयंत्र मनात ठेवून केंद्र सरकारने नागरिकत्त्व सुधारणा विधेयक (सीएबी) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) हे कायदे आणले आहेत. हे विधेयक संविधान विरोधी असून संविधानाच्या मूळ तत्वांना आघात पोहचविणारे आहेत. मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.नागरिकात्व सुधारणा विधेयक तसेच एनआरसीविरोधात आसाम व दिल्लीनंतर संपूर्ण देशात आंदोलनाचे लोन पसरत चालले आहेत. सोमवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरातही राष्ट्र सेवा दल, दक्षिणायन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम आदमी पार्टी, जामिया संघटना व सर्व सेवा संघ अशा विविध संघटनांनी मिळून सीएबी विरोधात आंदोलन केले. कॉटन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. देवी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. याप्रसंगी प्रभू राजगडकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अमिताभ पावडे, प्रज्ज्वला तट्टे, अतुल देशमुख, राजेंद्र झाडे, जगजित सिंह, शालिनी अरोरा, सविता सिंघल, रत्ना ढोरे, नरेंद्र पालांदूरकर, संजय बोंडे, सर्व सेवा संघाचे विद्रोही आदी प्रमुख विचारकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. देवी यांच्या नेतृत्वात उपस्थित सर्वांनी नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठी कुठलेही कागदपत्र सादर न करण्याची शपथ घेतली. अविनाश पाटील यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे काम सरकार करीत आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून त्यांचे षडयंत्र हानून पाडू, भारतीय एकता धर्मनिरपेक्ष आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल, अशी भावना त्यांनी मांडली. इतर विचारवंतांनीही आपले विचार व्यक्त करीत सीएबी विरोधात भावना मांडल्या. १९ ला देशव्यापी आंदोलननागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन केले जाणार आहे. यादिवशी नागपुरातही कॉटन मार्केट परिसरात याच स्थळी उपस्थित राहून देशव्यापी आंदोलनाचा भाग होणार असल्याचे अमिताभ पावडे यांनी सांगितले. नागरिकांनी संविधानविरोधी विधेयकाविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन