शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

सीए जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:07 IST

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून केली आहे. सरकारने या कायद्यात वर्षभरात अनेक बदल केल्यामुळे, ही करप्रणाली आता सर्वोत्तम आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे. विभागाने आतापर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केलेला नाही. या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चार्टर्ड अकाऊंटंटची भूमिका महत्त्वाची असून, ते जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिसादन राज्यकर नागपूर विभागाचे सहसंचालक पूनमचंद अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देपूनमचंद अग्रवाल : सीए संस्थेतर्फे जीएसटीवर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून केली आहे. सरकारने या कायद्यात वर्षभरात अनेक बदल केल्यामुळे, ही करप्रणाली आता सर्वोत्तम आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे. विभागाने आतापर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केलेला नाही. या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चार्टर्ड अकाऊंटंटची भूमिका महत्त्वाची असून, ते जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिसादन राज्यकर नागपूर विभागाचे सहसंचालक पूनमचंद अग्रवाल यांनी केले.चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) नागपूर शाखेतर्र्फे धंतोली येथील सभागृहात जीएसटीवर सहा दिवसीय सखोल अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अग्रवाल बोलत होते. यावेळी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए उमंग अग्रवाल, सीएद्वय रितेश मेहता, किरीट कल्याणी, शैलेंद्र जैन, संजय एम. अग्रवाल, साकेत बागडिया, राजीव सावंगीकर, आरती पाल्डीवाल, आयुष अग्रवाल, यश बुद्धवानी प्रामुख्याने उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, एक वर्षापासून करप्रणालीत वारंवार बदल करण्यात येत असल्यामुळे, व्यापाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. विभागाची आयटी सुविधा अद्ययावत झाली आहे. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांतर्फे दूर करण्यात येत आहेत. कायद्यात होणाऱ्या बदलांवर शाखेने जीएसटीची सखोल माहिती देण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करावे.केळकर यांनी कायद्यात होणाऱ्या बदलांची माहिती दिली. दरदिवशी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी सीएंनी नवीन कायदा शिकण्यास आणि समजण्यास उत्सुक असावे. प्रारंभी उमंग अग्रवाल यांनी जीएसटीवर जनजागृती करण्यासाठी शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. संस्थेचे विविध प्रस्ताव ऐकून आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यकर विभागाचे आभार मानले.कार्यशाळेत सीएद्वय शैलेंद्र जैन, रितेश मेहता, हेमंत सावंगीकर, सतीश सारडा, मिलिंद पटेल, प्रीतम बत्रा यांनी जीएसटीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक सीए संजय अग्रवाल यांनी केले तर सचिव सीए किरीट कल्याणी यांनी आभार मानले.

टॅग्स :chartered accountantसीएnagpurनागपूर