शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सीए शासन आणि करदात्यांमधील सेतू  :  आयकर आयुक्त प्रदीप मित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:29 AM

शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यांमध्ये सेतूचे काम करीत असल्याचे मत आयकर आयुक्त प्रदीप मित्रा (अपील) यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘फायनान्स बिल-२०१९’वर चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यांमध्ये सेतूचे काम करीत असल्याचे मत आयकर आयुक्त प्रदीप मित्रा (अपील) यांनी येथे व्यक्त केले.आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेतर्फे ’फायनान्स बिल-२०१९’ यावर आयोजित एक दिवस चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, आरसीएम सीए अभिजित केळकर, सीए जुल्फेश शाह, सीए अक्षय गुल्हाने, सीए राजेश लोया, सीए संजय एम अग्रवाल, सीए गिरीश आहुजा, सीए के.पी. देवानी, सीए साकेत बागडिया, सीए हरीश रंगवानी, सीए उमंग अग्रवाल, सीए किरीट कल्याणी, सीए राठी, नवी दिल्लीचे सीए डॉ. गिरीश आहुजा आणि मुंबईचे सीए दिलीप फडके उपस्थित होते.मित्रा म्हणाले, वेळ सर्व गोष्टींचे सार आहे. सीएंनी वेळेचे आणि कायद्याचे पालन करावे. त्यांनी ग्राहकांना शिक्षित करावे. वाढत्या जबाबदारीमुळे अधिकाऱ्यांना कागदपत्रांची आवश्यकता असते. अपील संदर्भात व्यावसायिकदृष्ट्या सीएंना लेखा आणि कर क्षेत्राची विस्तृत माहिती असते. त्यावर सीएंनी भर द्यावा. मित्रा यांनी अर्थसंकल्पातील आयकर तरतुदींमध्ये करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यांनी स्टार्टअपसाठी शासनाचे धोरण आणि फेसलेस आयटी आकलन योजनेवर प्रकाश टाकला आणि शासकीय उपलब्धींची माहिती दिली. ते म्हणाले, व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मानव संशाधनात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.प्रारंभी सीए सुरेश दुरगकर म्हणाले, तरतुदींचे पालन करण्यासाठी सीए विभागासोबत काम करीत आहे. नागपूर शाखेतर्फे निरंतर होणाऱ्या बदलांची माहिती देण्यासाठी सभासदांसाठी वेळोवेळी चर्चासत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करते.केळकर यांनी संस्थेच्या एसएसपी पोर्टलचा शुभारंभ आणि संचालनासह क्षेत्रीय स्तरावरील विविध उपक्रमांची माहिती दिली. गिरीश आहुजा म्हणाले, तरतुदींमध्ये अनेक बदल झाले आहेत. सीएंनी आयकर विवरण सावधतेने दाखल करावे. दिलीप फडके यांनी अप्रत्यक्ष करांमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली. उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी यांनी संचालन केले.

टॅग्स :chartered accountantसीएnagpurनागपूर